डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला येथे राष्ट्रीय उच्च शिक्षण प्रकल्पांतर्गत कृषि अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय, अकोला येथे माजी विद्यार्थी मेळाव्याचा समारोप कार्यक्रम दि. ०५ मार्च, २०२२ रोजी झाला. महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त या मेळाव्याचे आयोजन दिनांक ४ ते ५ मार्च, २०२२ दरम्यान करण्यात आले होते. या समारोप कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथि म्हणून डॉ. व्ही. के. खर्चे, संचालक (संशोधन), डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एस. बी. वडतकर, अधिष्ठाता, कृषि अभियांत्रिकी विद्याशाखा, डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला हे होते.
या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून डॉ. एम. बी. नागदेवे, माजी अधिष्ठाता (कृषि) तथा माजी अधिष्ठाता, कृषि अभियांत्रिकी विद्याशाखा, डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला, डॉ. खांदेतोड, अधिष्ठाता, कृषि अभियांत्रिकी विद्याशाखा, दापोली, डॉ. पी. जी. वासनिक, अधिष्ठाता, दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय, वरुड, पुसद, श्री. आनंद उपलेंचवार, माजी महाव्यवस्थापक, एम. ए. आय. डी. सी., मुंबई तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असणारे माजी विद्यार्थी हे या समारोप कार्यक्रमप्रसंगी, रौप्य महोत्सवी खुले व्यासपीठ, कृषि अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय, अकोला येथे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ. एस. आर. काळबांडे, प्रमुख अन्वेषक, राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प तथा कुलसचिव, डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला यांनी आपल्या भाषणात या मेळाव्यादरम्यान घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांबद्दल विस्तृत माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि डॉ. व्ही. के. खर्चे, संचालक (संशोधन), डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला यांनी आपल्या भाषणात नाविन्यपूर्ण कृषि अभियांत्रिकी तंत्रज्ञान, उपकरणे तसेच अवजारे कृषि साठी आवश्यक असून या विद्याशाखेने महत्वपूर्ण योगदान यामध्ये दिले आहे व आणखी चांगल्या प्रकारचे संशोधन अपेक्षित आहे असे विचार व्यक्त केले. त्यांनी कृषि विद्याशाखेद्वारे विद्यापीठात करण्यात आलेली विविध कामे जसे मृद व जलसंधारण संरचना, सौर ऊर्जा संवर्धन याची प्रशंसा केली. त्यांनी माजी विद्यार्थी मेळावा आयोजन महत्वाचे असून याद्वारे माजी विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा पुढील करियर निवडन्यासाठी विद्यार्थ्यांना निश्चितच होईल अशी आशा व्यक्त केली.
डॉ. एस. बी. वडतकर, अधिष्ठाता, कृषि अभियांत्रिकी विद्याशाखा,
डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात लवकरच सी. ए. ई. टी. अलुमनाय आसोसिएशन अशी मोबाईल ऍप गुगल स्टोर वर उपलब्ध होईल अशी माहिती त्यांनी उपस्थीतांना दिली. या ऍप द्वारे माजी विद्यार्थ्यांचे नेटवर्क व लिंकेजेस वाढविण्यास मदत होईल व याद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी एक प्लॅटफॉर्म तयार होईल असे सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्वाती नारनवरे व कु. रसिका बुरघाटे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. ए. एन. मानकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व कर्मचारी राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प व पिडीकेव्ही रिसर्च व इन्क्यूबेशन फॉउंडेशन, डॉ पंदेकृवि, अकोला यांनी विशेष परिश्रम घेतले.
Share your comments