1. बातम्या

जलवायु बदलामुळे होणारे कृषी उत्पादकता प्रभावित

KJ Maharashtra
KJ Maharashtra
climate change

climate change

 महाराष्ट्राला जलवायु बदलाच्या वाढत्या  संकटाचा सामना करावा लागत आहे. याचा परिणाम हा थेट कृषी उत्पादनावर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल कम्युनिटीच्या अभ्यासानुसार सोयाबीन, कापूस, गहूआणि रचना या पिकांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

 इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल कम्युनिटीच्या महाराष्ट्रातील कृषी वर  जलवायु बदलाचा प्रभाव या अहवालात मागील तीस वर्षाचे अभ्यासात्मक विश्लेषण करण्यात आले आहे. या अहवालावरून खानदेश, मराठवाडा तसेच विदर्भातील आठ जिल्ह्यात2021ते 2050 पर्यंत संभाव्य पावसाचाआणि उष्णता मानाचा अंदाज लावण्यात आला आहे.हे संशोधन आयएससी येथील असोसिएट डायरेक्टर रोहित सेन यांच्या नेतृत्वात झाले आहे.

 या झालेल्या विश्लेषणात जलवायु संबंधित विस्तृत माहितीच्या आधारावर अंदाज काढण्यात आले आहेत. या विश्लेषणात खरीप आणि रब्बी हंगामातील पाऊस आणि तापमानावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मान्सूनच्या अनियमित आगमन त्याचा कापूस आणि सोयाबीन पिकावर पडणारा प्रभाव दर्शवला गेला आहे. मध्ये खरिपाच्या हंगामात बुरशी आणि किडी मध्ये वाढवून सोयाबीन आणि कापसावर त्याचा प्रतिकूल परिणाम दर्शवण्यात आला आहे. या अहवालाच्या अनुषंगाने आद्रतेमुळे मातीच्या पोषक तत्त्वांची हानी होईल असे दर्शविण्यात आले आहे. आगामी काळात गव्हाची शेती अधिक आव्हानात्मक असेल तसेच धान्य पिकण्याच्या काळात तापमान वाढल्याने दाणा भरणार नाही. वजन कमी भरेल.

चना हंगामातही अचानक पणे तापमान वाढलेले असल्याने उत्पादन आणि गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम होईल असे या विश्लेषणात सांगण्यात आले आहे.

 रब्बी हंगामाच्या काळात फारच कमी किंवा नगण्य पावसाची भविष्यवाणी वर्तविण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण पिकाबद्दल चिंताजनक वातावरण असेल त्यामुळे सिंचनावर भर राहणार असल्याने भूजल स्तरावर दबाव वाढेल. शेतीवरील जलवायू परिवर्तन याचा प्रभाव कमी करण्यासाठी बरेच उपाय करावे लागतील तसेच शेतीच्या व्यवस्थापनाचे नवे तंत्र अवलंबावे लागेल असे आएससीचे कंट्री डायरेक्टर विवेक पी. अधिया म्हणाले.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters