चीनने केली जगातील सर्वच शेतमालाची खरेदी; ११७.०३ टन गव्हाची खरेदी

16 March 2021 05:14 PM By: भरत भास्कर जाधव
चीनकडून शेतीमालाची आक्रमक खरेदी

चीनकडून शेतीमालाची आक्रमक खरेदी

जागतिक पातळीवर जवळपास सर्वच शेतमालाची चीनने मोठी खरेदी केली आहे. भात, गहू,सोयाबीन, मका आणि कापसाचा मोठा चीनने केला आहे. जागतिक पातळीवर गव्हाच्या एकूण ३१८.२० दक्षलक्ष टन साठ्यापैकी तब्बल ११७.०३ टन साठा चीनमध्ये आहे. तर भाताच्या जागतिक १७७.८३ दशलक्ष टन साठ्यापैकी ११६.४० दशलक्ष टन साठा एकट्या चीनमध्ये आहे, अशी माहिती अमेरिकेच्या कृषी विभागाने (युएसडीए) प्रसिद्ध केलेल्या अहवालातून मिळाली आहे.

जगातील एकूण शेतमालाच्या साठ्यात चीनचा वाटा मोठा असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात चीनला महत्त्व प्राप्त झाले आहे. जगात गव्हाचा पुरवठा फेब्रुवारीच्या तुलनेत मार्च महिन्यात ३५ लाख टनांनी वाढून १०७७.१ दशलक्ष टन झाला आहे. ऑस्ट्रेलियात गव्हाचे उत्पादन वाढल्याने जागतिक उत्पादन ७७६.८ दशलक्ष टनांवर पोहोचले आहे. ऑस्ट्रेलियात गव्हाचे उत्पादन विक्रमी ३३ दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे. चीनमध्ये मानवी वापर आणि पशुखाद्यासाठी मागणी वाढल्याने गव्हाचा वापरही वाढला आहे. जागतिक गव्हाचा वापर ६६ लाख टनांनी वाढून ७७५.९ दशलक्ष टन राहण्याचा अंदाज आहे.

देशनिहाय गहू निर्यात

अर्जेंटिना - ११.५०

ऑस्ट्रेलिया - २२

कॅनडा - २७

देशनिहाय गहू आयात

बांगलादेश - ६.६०

ब्राझील - ६.७०

चीन - १०-५०

बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियात भात उत्पादनात घट होऊनही भारतात मोठी वाढ झाल्याने जागतिक भात उत्पादनातही वाढ झाली आहे. भारतात यंदा उत्पादकता विक्रमी राहिल्याने उत्पादनही १२१ दशलक्ष टनांवर विक्रमी राहिल्याचे अहवालात म्हटले आहे.

देशनिहाय भात निर्यात (दशलक्षात टनात

बर्मा - २.४०

भारत १५.५०

पाकिस्तान - ४.१०

देशनिहाय भात आयात (दशलक्ष टनांत)

चीन - ३

युरोपियन देश - २.४०

इंडोनेशिया - ०.५०

जागतिक पातळीवर भरडधान्याचे उत्पादन ५९ लाख टनांनी वाढले आहेत. त्यामुळे जागतिक उत्पादन १४४४.८ दशलक्ष टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जागतिक भरडधान्य उत्पादन आणि व्यापारात वाढ होण्याची शक्यता आहे.

देशनिहाय भरडधान्य (दशलक्ष टन)

अर्जेंटिना - ३७.८१

ऑस्ट्रेलिया - ६.९५

ब्राझील - ३९.०३

देशनिहाय भरडधान्य आयात (दशलक्ष टनांत)

युरोपियन देश - १५.७६

जपान - १७-२२

मेक्सिको - १६-८८

भारत, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशात उत्पादन वाढल्याने जागतिक पातळीवरही मका उत्पादनात वाढ झाली आहे. तर मेक्सिकोत मका उत्पादनात घट झाली आहे. भारतात मका पेरणी आणि उत्पादकता वाढल्याने वाढ झाल्याचे  अहवालात म्हटले आहे.

देशनिहाय मका निर्यात (दशलक्ष टन)

अर्जेंटिना - ३४

ब्राझील - ३९

रशिया  - ३.१०

देशनिहाय मका आयात  (दशलक्ष टन)

इजिप्त - १०.३०

युरोपियन देश - १५.३०

जपान - १५-६०

 

कापूस उत्पादनात घट

जागतिक पातळीवर कापसाचे कमी उत्पादन आणि शिल्लक साठ्यातही घट येणार असल्याचे म्हटले आहे. मात्र यंदा कापसाचा वापर आणि वाढणार असल्याचे म्हटले आहे. ब्राझील आणि अमेरिकेत उत्पादनात मोठी घट झाल्याने जागतिक कापूस उत्पादनात ८ लाख ३० हजार गाठींनी कमी होण्याची शक्यता आहे. टर्की, बांगलादेश, पाकिस्तान आणि व्हिएतनाम या देशांमध्ये कापसाचा वापर वाढण्याची शक्यता आहे.

देशनिहाय कापूस निर्यात (दशलक्ष टन)

मध्य आशिया - १.६३

आफ्रिका  - ४.७७

दक्षिण गोलार्ध  - १२.५७

देशनिहाय कापूस आयात (दशलक्ष गाठी )

मेक्सिको - ०.८०

चीन - ११

युरोपियन   देश - ०.६१

चीनकडून सोयाबीनची मोठी आयात

जागतिक पातळीवर सोयाबीनचे उत्पादन वाढले आहे. ब्राझीलमध्ये सोयाबीन उत्पादन १० लाख टनांनी वाढून १३४ दशलक्ष टन राहणार आहे. भारतातही सोयाबीन उत्पादन २ लाख टनांनी वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

देशनिहाय सोयाबीन निर्यात (दशलक्ष टन )

अर्जेंटिना  -७

ब्राझील - ८५

पेरुग्वे - ६.५०

देशनिहाय सोयाबीन आयात (दशलक्ष टनात)

चीन - १००

युरोपियन देश - १५.१५

आग्नेय आशिया - ९.६३

जगाच्या तुलनेत चीनमधील साठा  (टक्क्यात)

६८ टक्के

मका

५० टक्के

गहू  ६२ टक्के

भरडधान्य

६५ टक्के

भात ३९ टक्के

कापूस ३५ टक्के

सोयाबीन

मालाचा जगाच्या तुलनेत चीनमध्ये साठा (दशलक्ष टनात) (कापूस दशलक्ष गाठींत)

जगात  २८७.६७

चीन १९६.१८

मका

३०१.१९

चीन

१५०.४३

गहू

जगात  ३१८.२०

चीन १५०.४३

 

भरडधान्य

जगात

१७७.५९

चीन

११६.४०

भात

जगात ९४.५९

चीन  - ३७.२७

कापूस  जगात ८३.७४

चीन २९.६०

china चीन शेतमालाची खरेदी commodities
English Summary: China buys all commodities from world

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.