चंद्रपूर
विदर्भातील बुलढाणा, यवतमाळ जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपले आहे. पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने नुकसानग्रस्त भागांचे तात्काळ पंचनामे करुन सदर प्रस्ताव लवकर सादर करावेत, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा आणि नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेतला.
अतिवृष्टीमुळे पूर आलेल्या गावांमधील ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून त्यांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे, त्याठिकाणी ग्रामस्थांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात याव्यात आणि आपत्तीकाळात जिल्हा प्रशासनाने दक्ष राहण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या आहेत.
दरम्यान, विदर्भात झालेल्या मुसळधार पावसाने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. चंद्रपूर, बुलढाणा, यवतमाळ जिल्ह्यांतील पूरस्थिती कायम आहे. गेल्या १० दिवसांत पुरामुळे किमान १६ जण दगावले असून घरे व शेतीचीही मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.
Share your comments