20 ते 21 फेब्रुवारी दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता
मुंबई: विदर्भ आणि मराठवाड्यातील हवामान अस्थिर होणार असल्यामुळे दि. 20 ते 21 फेब्रुवारी दरम्यान काही भागात वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांतील बऱ्याच भागात या काळात मेघ-गर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच यवतमाळ, वर्धा, नागपूर, जालना, परभणी, हिंगोली आणि औरंगाबाद जिल्ह्यांतील काही भागांत देखील वादळी पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

वादळी पावसासोबत काही प्रमाणात गारपीट होण्याची देखील शक्यता आहे. या आठवड्यात संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमानात वाढ होऊन दि.20ते 22फेब्रुवारी दरम्यान काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहील,असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे.
शेतकऱ्यांनी या हवामानाच्या परिस्थितीनुसार नियोजन करून शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल तर तो व्यवस्थितपणे झाकून ठेवावा. वादळी पावसाच्यादरम्यान सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. मोकळ्या मैदानात तसेच झाडाखाली अथवा पत्र्याच्या शेडमध्ये थांबणे टाळावे,असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
English Summary: Chances of rainfall in Vidarbha and Marathwada between 20-21th FeburaryPublished on: 19 February 2019, 07:58 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments