पुणे
हवामान खात्याने आज (दि.३) रोजी कोकण, घाटमाथा, पूर्व विदर्भात तूरकळ ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट कायम आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरीतील घाट घाटमाथ्यावर पावसाची शक्यता आहे. तसंच उर्वरित भागातही हलक्या पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यात मागील दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. पण ढगाळ वातावरण आणि ऊन सावल्यांचा खेळ सुरुच आहे. तसंच राज्याच्या काही भागात हलक्या पावसाच्या सरी देखील कोसळत आहेत.
Share your comments