1. बातम्या

Rain Update : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाची उघडीप; हवामान खात्याची माहिती

मागील आठवड्यात राज्यात पावसाने हाहाकार माजवला होता. आज (दि.३१) रोजी देखील कोकण घाटमाथ्यावर तुरकळ ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Rain Update

Rain Update

पुणे 

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील पाऊस उघडीप देणार असल्याची माहिती हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या दरम्यान मुंबईसह राज्यात पावसाच्या हलक्या सरी बसरण्याची शक्यता असून मुसळधार पाऊस होणार नाही, असंही हवामान खात्याने म्हटलं आहे. 

राज्यात सुरू असलेला पाऊस ओसरल्यानंतर राज्यात ढगाळ हवामानासह अधून-मधून हलक्या सरी कोसळत आहेत. काही ठिकाणी बऱ्याच दिवसांनंतर सूर्य दर्शन होत ऊन सावल्यांचा खेळ सुरू होता.

दरम्यान, मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी ३० ते ४० प्रति किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा आणि विजांचा कडकडाट, ढगांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. इतर भागात पावसाची शक्यता आहे.

English Summary: Chance of rain in the first week of August Information from Meteorological Department Published on: 31 July 2023, 03:21 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters