1. बातम्या

विदर्भासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता


पुणे : यावर्षी वेळेवर आलेला मॉन्सून आणि धरणामध्ये असलेल्या अतिरिक्त साठ्यामुळे यंदा १७ जुलैपर्यंत खरिपाचा पेरा मागच्या वर्षीच्या तुलनेत तब्ब्ल २१% नी वाढला आहे. मागच्या वर्षी याचा कालावधीत ५७०.८६ लाख हेक्टरवर खरिपाची लागवड झाली होती. यावर्षी १७ जुलैपर्यंत ६९१.८६ लाख हेक्टरवर खरिपाची लागवड झाली आहे.
यामध्ये प्रामुख्याने तांदळाचा समावेश आहे. मागच्या वर्षी याचा कालावधीत भाताची १४२ लाख हेक्टरवर लागवड झाली होती. यावर्षी आतापर्यन्त १६८ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. तेलबियांची लागवड ११० लाख हेक्टरवरून १५५ लाख हेक्टर एवढी वाढली आहे. कापसाची लागवड ९६ लाख हेक्टरवरून वाढून ११३ लाख हेक्टर झाली आहे. केंद्र सरकारच्या अनुमानावरून देशात अजूनही काही ठिकाणी पेरणी चालू आहे. यावर्षी देशाच्या सर्वच भागात चांगला पाऊस असून त्यामुळे पिके शेवटपर्यंत टिकून राहण्याचे प्रमाण जास्त राहणार आहे.

जर कोणतेही अस्मानी किंवा सुलतानी संकट आले नाही तर यंदा शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळेल अशी अशा आहे. राठवाड्यातील औरंगाबादजालनाबीडउस्मानाबादआणि विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. दरम्यान एनसीआरमध्ये  पावसाचे सत्र चालू आहे. बुधवारी दिल्ली- एनसीआरच्या सर्व भागात पाऊस झाला.  तर हिमाचल प्रदेशच्या सहा जिल्ह्यांमध्ये २४ ते २६ जुलैपर्यंत दमदार पाऊस होणार असल्याचा अंदाज असून येथे येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters