Rain Update : अलर्ट! राज्याच्या 'या' भागांत विजांसह जोरदार पावसाची शक्यता
हवामान खात्याने घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी केला आहे. तर बंगालच्या उपसागरात कमी झालेल्या पट्ट्यामुळे राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागातील पाऊस सुरु आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापुरात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
कोकण घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरु आहे. धरणलोट क्षेत्रात देखील पाऊस असल्याने पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे. तसंच विदर्भासह, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात विजांसह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने घाटमाथ्यावर देखील रेड अलर्ट दिला आहे.
मुंबईला पूर्वी ऑरेज अलर्ट देण्यात आला होता. हवामानात बदल झाल्याने ऑरेज अलर्ट वरुन मुंबईला रेड अलर्ट दिलाय. मुंबईच्या काही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे.
दरम्यान, विदर्भाच्या काही भागात देखील पावसाची शक्यता आहे. तर अमरावती, अकोला, वाशिम, गोंदिया, गडचिरोली, नागपूर येथे विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे.
English Summary: Chance of heavy rain with lightning in the statePublished on: 27 July 2023, 11:14 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments