1. बातम्या

Weather Update Maharashtra : राज्यात दमदार पावसाची शक्यता; या भागात 'रेड अलर्ट'

सध्या कोकण, घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी सुरूच असून, उर्वरित राज्यातही कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. आज (ता. २६) रायगड, रत्नागिरीसह पुणे, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर अति जोरदार पावसाचा ‘रेड अलर्ट’ आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Rain Update

Rain Update

पुणे 

राज्यात दमदार पावसाची शक्यता आहे. कोकण, घाटमाथा परिसरात पावसाचा जोर वाढणार आहे. तर रायगड, रत्नागिरीसह पुणे, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर अति जोरदार पावसाचा ‘रेड अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे.

सध्या कोकण, घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी सुरूच असून, उर्वरित राज्यातही कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. कोकण, कोल्हापूर, नांदेड, गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी दमदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यातील पूर्व-पश्चिम वाऱ्यांचे जोडक्षेत्र समुद्र सपाटीपासून ५.८ ते ७.६ किलोमीटर उंचीवर आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा, दक्षिण कोकणापासून उत्तर केरळ सक्रिय आहे.

English Summary: Chance of heavy rain in the state Published on: 26 July 2023, 11:14 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters