गेल्या महिन्यामध्ये राज्यात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) धुमाकूळ घातला. त्यानंतर पुन्हा एकदा उन्हाची तीव्रता (Heat Wave) वाढत असल्याचा चित्र बघायला मिळालं. अशा परिस्थितीत राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
राज्यात 7, 8, आणि 9 एप्रिल रोजी विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. राज्यामध्ये अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, संभाजीनगर, परभणी, जळगाव, बुलढाणा, जालना, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये 7, 8 आणि 9 एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात (Weather Update) आली आहे.
यामुळे काढणीला आलेली पिके लवकरात काढण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन देखील हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांची अजून काढणी बाकी आहे. तर अनेक शेतकऱ्यांची हळद, मका, कांदा इत्यादी पिकांची काढणी सुरू आहे.
वाढत्या मागणीने लिंबू दरात सुधारणा, शेतकऱ्यांना दिलासा
असे असताना शेतकऱ्यांनी 5 एप्रिलच्या आधी सर्व पिकांची काढणी करून घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याकडून (Weather Update) करण्यात आले आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या रब्बी पिकांची नासाडी झाली आहे.
दरम्यान, मार्च महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने हजेरी (Weather Update) लावली. सध्या अनेक शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांची अजून काढणी बाकी आहे. यामुळे काळजी व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाची भीती! 24 तासांत 669 नवीन प्रकरणे, देशभरात आकडा वाढला..
शेतकऱ्यांनो भेंडी लागवड व्यवस्थापन, जाणून घ्या..
शेतकऱ्यांनो आडसाली ऊस व्यवस्थापन...
Share your comments