Rain Update : राज्यात पुढील ५ दिवसात मुसळधार पावसाची शक्यता; हवामानात झाला मोठा बदल
बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. हा कमी दाब पट्टा मंगळवारी संध्याकाळपर्यंत खेपुपाराच्या पूर्वेला बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्यची शक्यता आहे.
राज्यात पुढील चार ते पाच दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सध्या मान्सूनने दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात देशात नॉर्मल पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
दरम्यान, भारताच्या काही भागांमध्ये नॉर्मल ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. दक्षिण द्वीपकल्पातील बहुतेक भागांमध्ये आणि वायव्य आणि मध्य भारताच्या पश्चिम भागांच्या अनेक भागांमध्ये नॉर्मल पेक्षाही कमी पाऊस होण्याची शक्यता आहे.
English Summary: Chance of heavy rain in next 5 days in the state There was a big change in the weatherPublished on: 01 August 2023, 05:51 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments