सध्या द्राक्ष काढणीचा हंगाम चालू आहे. अशातच पाऊस जर झाला तर द्राक्ष उत्पादक (Grape Farmers) शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. फळघडाचे नुकसान होवून फंगसचे आक्रमण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पावसाचा इतर पिकांनांही फटका बसण्याची शक्यता आहे.
सध्या वातावरणात सातत्याने बदल (Climate change) होत आहेत. हवामान विभागानं (India Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार आजपासून सहा मार्चपर्यंत राज्याच्या काही भागात पावसाची (Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाबरोबर तूरळक ठिकाणी कदाचित गारपीट होण्याचीही शक्यता आहे.
पाऊस जरी 2 ते 10 मिमी असला तरी त्याचबरोबर वाराही ताशी 20 ते 25 किमी वेगाचा असु शकतो. सहा मार्च रोजी सर्वत्रच पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पाच मार्च रोजी नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाण्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शेतकऱ्यांचा वाली आहे का कोणी? अधिवेशनात बघताय ना कसा राडा सुरूय..
उत्तर कोकण देखील पावसाची शक्यता कायम आहे. मात्र, अतिशय तुरळक पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भात देशील पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकण देखील पावसाची शक्यता कायम आहे. मात्र, अतिशय तुरळक पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून व्यक्त करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनो कोरडवाहू शेतीतील खर्च करा कमी, तुमचं बजेट करा तयार..
दरम्यान,राज्यातील वातावरणात सातत्याने बदल (Climate change) होत आहेत. हवामान विभागानं (India Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार आजपासून सहा मार्चपर्यंत राज्याच्या काही भागात पावसाची (Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या;
100 म्हशी आणि 100 एकर जमीन! रामेश्वर मांडगेंनी करून दाखवलं
उत्पादक उपाशी, व्यापारी तुपाशी, कांद्याचा झालाय वांदा...
धेनू ॲपच्या तंत्रामुळे फक्त एका तासातच विकली गाय, खरेदी विक्री झाली खूपच सोपी
Share your comments