1. बातम्या

ढगाळ हवामानासह राज्यात संततधार पावसाची शक्यता


बंगालच्या उपसागरात व अरबी समुद्रात हवेच्या दाबाची स्थिती काही प्रमाणात शिथील झाली आहे. त्यामुळे राज्यात आज आणि उद्या सर्वत्र ढगाळ हवामानासह अनेक ठिकाणी संततधार पाऊस राहणार असल्याच अंदाज हवामान विभागाच्या सुत्रांनी दिला आहे. उत्तर भारतात असलेल्या मॉन्सून पट्टा मंगळवारी काही प्रमाणात सरकरणार आहे. तर बुधावरी उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. गुरुवारी या दाबाचे चक्राकार वाऱ्यांचे रुपांतर होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे कोकण व घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा जोर कमी राहणार आहे. विदर्भातील अनेक भागात पावासाची संततधार सुरू राहणार आहे. आज कोकणात काही ठिकाणी जोरजार व मध्य महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातही हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वार वाहणार आहे. दरम्यान शनिवारी सकाळी वाजेपर्यंतत महाबळेश्वर येथे १५० मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters