1. बातम्या

सरकारचा शेतकऱ्यांना इशारा! पीएम कुसूम योजनेच्या बनावट वेबसाइट पासून रहा सावध,अन्यथा पैसे बुडतील

नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि लोकांना पीएम कुसुम योजना च्या नावाने चालवल्या जाणाऱ्या बनावट वेबसाइट बद्दल जागरूक केले असून त्यांना कोणत्याही असत्यापित लिंक वर क्लिक करू नये असा सल्ला देण्यात आला आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
central goverment alert to farmer about pm kusum scheme fake website

central goverment alert to farmer about pm kusum scheme fake website

नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि लोकांना पीएम कुसुम योजना च्या नावाने चालवल्या जाणाऱ्या बनावट वेबसाइट बद्दल जागरूक केले असून त्यांना कोणत्याही असत्यापित लिंक वर क्लिक करू नये असा सल्ला देण्यात आला आहे.

MNRE प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाअभियान योजना राबवत आहे. या अंतर्गत सौर पंप बसवण्यासाठी आणि कृषी कारणासाठी वापरल्या जाणाऱ्या पंपांना सौर ऊर्जा देण्यासाठी अनुदान दिले जाते.

याबाबत मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, पीएम कुसुम योजनेअंतर्गत नोंदणी करण्याचा दावा काही बनावट वेबसाइटच्या ऑपरेशनची माहिती समोर आली आहे. या बनावट वेबसाइट या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लोकांकडून पैसा गोळा करण्यात गुंतलेले आहेत.

या पार्श्वभूमीवर मंत्रालयाने शेतकऱ्यांना सावध केले आहे की, व्हाट्सअप किंवा एस एम एस द्वारे पाठवलेल्या कोणत्याही नोंदणी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी ते सत्यापित करणे आवश्यक आहे.

 कुठल्याही प्रकारचे नोंदणी शुल्क करिता पैसे जमा करू नका

MNRE यापूर्वी लोकांना माहिती दोन नोंदणीशुल्क च्या नावाने पैसा जमा करू नयेत असा सल्ला दिला होता. यासंदर्भात आलेल्या तक्रारीच्या आधारे संबंधितांवर कारवाई देखील करण्यात आली आहे.

त्यामुळे प्रधानमंत्री कसम योजनेसाठी अर्ज करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना सुचित करण्यात येते की त्यांनी फसव्या वेबसाईट्सना भेट देऊ नका आणि कोणतेही पैशांचा व्यवहार करू नका. योजना राज्य सरकारच्या विभागांकडून राबविण्यात येत आहे.

याबाबत संबंधित मंत्रालयाने म्हटले आहे की, पीएम कुसुम योजना अंतर्गत पात्रता तपासणी आणि पूर्ण प्रक्रियेची माहिती या योजनेच्या  https://pmkusum.mnre.gov.in या वेबसाइटवर संकलित केली जाऊ शकते.

तसं या योजनेच्या अधिक माहितीसाठी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईट www.mnre.gov.in किंवा टोल फ्री क्रमांक 1800-180-3333 का संपर्क करा व फसवणूक होऊ नये यासाठी काळजी घ्या.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:भावांनो! शेतात शेणखत टाकतात परंतु हुमनी सारख्या इतर कीटकांना निमंत्रण तर देत नाही ना? नाहीतर होऊ शकते पिकांचे नुकसान

नक्की वाचा:Pm Kisan:आधार क्रमांकाच्या सहाय्याने तपासा तुमच्या खात्यात पैसे आले की नाही अन जाणून घ्या FTO चा अर्थ

नक्की वाचा:Bima Ratna Policy: एलआयसीने लॉन्च केली विमारत्न पॉलिसी, जाणून घेऊ या पॉलिसीचे फायदे

English Summary: central goverment alert to farmer about pm kusum scheme fake website Published on: 31 May 2022, 09:37 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters