1. बातम्या

केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून २७ कीडनाशकांवर बंदी

केंद्रीय कृषी मंत्रालयाने भारतात नोंदणीकृत वा वापरात असलेल्या २७ कीडनाशकांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. मानवी आरोग्य, पर्यावरण, जलचर, पक्षी, मधमाशी आदी सजीवांना असलेला धोका , संबंधित रसायनाविरुद्ध विकसीत झालेली प्रतिकारक्षमता, अवशेष समस्या आदी कारणांचा सर्वांगीण अभ्यास , अहवाल केंद्रीय किटकनाशक मंडळ व नोंदणी समिती अंतर्गत तज्ज्ञ समितीमार्फत कीडनाशकांचे झालेले फेरमुल्यांकन या आधारावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
छायाचित्र  हिंदू

छायाचित्र हिंदू


केंद्रीय कृषी मंत्रालयाने भारतात नोंदणीकृत वा वापरात असलेल्या २७ कीडनाशकांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. मानवी  आरोग्य, पर्यावरण, जलचर, पक्षी, मधमाशी आदी सजीवांना असलेला धोका , संबंधित  रसायनाविरुद्ध  विकसीत  झालेली प्रतिकारक्षमता,  अवशेष समस्या आदी कारणांचा सर्वांगीण अभ्यास , अहवाल  केंद्रीय किटकनाशक मंडळ व नोंदणी समिती अंतर्गत तज्ज्ञ समितीमार्फत कीडनाशकांचे झालेले फेरमुल्यांकन या आधारावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील सुचना १८ मे गॅझेटद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. बंदी करण्यात आलेल्या कीडनाशकांमध्ये १२ कीटकनाशके, ७ तणनाशके, ८ बुरशी नाशके यांचा समावेश आहे. 

केंद्रीय  कृषी मंत्रालयांतर्गत ८ जुलै २०१३  मध्ये तज्ज्ञांच्या समितीची स्थापना केली होती. भारतात नोंदणीकृत असलेल्या निओनिकोटिनॉईडस गटातील कीटकनाशकांचा वापर सुरू ठेवण्याबाबत परीक्षण करण्याची जबाबदारी या समितीकडे दिली होती. ऑगस्ट २०१३ मध्ये या उद्दिष्टात अजून ६६ कीटकनाशकांचे फेरमुल्यांकन करण्याची जबाबदारी वाढविण्यात आली. परदेशात या कीडनाशकांवर बंदी आहे, पण भारतात ज्या कीडनाशकांची नोंदणी वा वापर सूरू आहे अशा कीडनाशकाचे फेरमूल्यांकन याद्वारे करण्यात येणार होते. याचा अभ्यास केल्यानंतर समितीने ९ डिसेंबर २०१५ रोजी याचा अहवाल केंद्र सरकारकेड सादर केला. त्यानुसार २७ कीडनाशकांचा वापर सुरू ठेवण्याची शिफारस समितीद्वारे करण्याती आली. मात्र हा निर्णय घेताना या कीडनाशकांचा पुर्नअभ्यास  झाल्यानंतर त्याचे फेरमूल्यांकन करणयात येणार होते. त्यानुसार संबंधित कीडनाशकांविषयीची  संपूर्ण तपशील, सुरक्षिता, जैविक  क्षमता  या आवश्यक सर्व बाजूंनी अभ्यास झाल्यानंतर त्याचा अहवालही सुपूर्त करण्यात आला. त्यानंतर केंद्र सरकारने सीआयबीआरसीशी सल्लामसलत करून २७ कीडनाशकांवर बंदी घालण्याची नवी सूचना १८ मे रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सुचनेनुसार,  तारखेपासून नमुद केलेल्या कीडनाशकांची आयात, उत्पादन, विक्री, वाहतूक, वितरण  आणि त्याचा वापर कायद्यान्वये कोणाही व्यक्तीस करता येणार नाही. कीडनाशक नोंदणीकरण, समितीमार्फत संबंधित कीडनाशकांना देण्यात आलेली प्रमामपत्रे रद्दबातल ठरविण्यात येतील. या कीडनाशकांची प्रमाणपत्रे ज्यांच्याकडे असतील त्यांनी तीन महिन्यांच्या आत नोंदणीकरण समितीकडे ती परत करणे कायदेशीर रित्या बंधनकारक आहे. अन्यथा त्याविरुद्ध कायदेशीर कारवाईला समोरे  जावे लागेल.

ही आहेत बंदी घालण्यात आलेली कीडनाशके

अॅसिफेट- कीटकनाशक

बेनफ्युराकार्ब, कार्बोफ्युरॉन,  क्लोरपायरीफॉस, डेल्टामेथ्रीन, डायकोफॉल, डायमिथोएट, मॅलॅथिऑन,  मिथोमील, मोनोक्रोटोफॉस, क्किनॉलफॉस,  थायोडीकार्ब

तणनाशके - अॅट्राझीन - तणनाशक, ब्युटाक्लोर - तणनाशक, टू फोर डी, डायुरॉन, ऑक्सीफ्लोरफेन, पेडीमिथॅलीन, सल्फोसल्फ्यूरॉन,

बुरशीनाशके - कॅप्टन , कार्बेन्डाझिम, डिनोकॅप, मॅकोझेब, थायोफेनेट मिथाईल, थायरम, झायनेब, झायरम

का घालण्यात आली बंदी

  • सर्वाधिक विषारी
  • संबंधित कीडनाशकांसंबंधीचा मानवी आरोग्य, अन्य सजीव आणि पर्यावरणातील विषारीपणा त्याची जैविक क्षमता याबाबत वैज्ञानिक तपशील संबंधितांना उपलब्ध केलेलेला नसणे.
  • केवळ कीडनाशक नव्हे तर त्यापासून तयार होणाऱ्या उप रसायनांपासूनही धोका.
  • सस्तन प्राणी व मानवी आरोग्यास धोकादायक.
  •  सस्तन प्राणी, जलाशये, मासे, व अन्य जलचर सजीव, पक्षी, गांडुळे, मधमाशा यांना धोका. 
  • कीडनाशकांवर ऐवजी त्याला पर्यायी कीडनाशक उपलब्ध असणे.

English Summary: central agriculture ministry ban on 27 pesticides Published on: 21 May 2020, 12:02 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters