दि. २८ जानेवारी २०२२ रोजी कृषि महाविद्यालय, अकोला येथे 'मराठी भाषा गौरव दिन' व 'राष्ट्रीय विज्ञान दिन'' चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन कृषि महाविद्यालयातील विद्यार्थी खासकरून आर- आर सिरिज यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कर्मवीर डॉ.भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करूण दिपप्रज्वलन करण्यात आले.सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे मा.डॉ.कोकाटे सर हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
काय्रक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणुन डाॅ.गिरीश जेऊघाले सर ,डाॅ. अनिल खाडे सर, डाॅ.भगत सर ,डाॅ. दिलीप धुळे सर हे होते. माननीय डाॅ. कोकाटे सर यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेची महती सांगितली,तसेच विज्ञानाची जोड साधुन अधिक प्रगती करण्याचे आव्हान केले. तसेच डाॅ. खाडे सरांनी सुद्धा विज्ञानाच्या मदतीने अंधश्रद्धा निर्मुलन करण्याचे विद्यार्थ्यांना आव्हान केले. तसेच मयुर बोरगावकर,अनिकेत पजई या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले,
या कार्यक्रमाचे आयोजन कृषि महाविद्यालयातील विद्यार्थी खासकरून आर- आर सिरिज यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कर्मवीर डॉ.भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करूण दिपप्रज्वलन करण्यात आले.सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे मा.डॉ.कोकाटे सर हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. काय्रक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणुन डाॅ.गिरीश जेऊघाले सर ,डाॅ. अनिल खाडे सर, डाॅ.भगत सर ,डाॅ. दिलीप धुळे सर हे होते.
कमलेश राठोड याने मराठी दिनानिम्मित वि. वा.शिरवाळकर यांची 'कणा' ही कविता सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री व्यवहारे हिने केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रुती निचट हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्याम काले, राम चांडक, श्रद्धा कटरे या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कृषि महाविद्यालय अकोला,चे प्रथम,व्दितीय ,तृतीय वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते.
Share your comments