1. बातम्या

पिडीकेव्ही रिसर्च व इन्क्युबेशन फाऊंडेशन अकोला द्वारे अॅग्री स्टार्टअप साठी क्षमता बांधणी कार्यक्रमाचे आयोजन

पिडीकेव्ही रिसर्च व इन्क्युबेशन फाऊंडेशन, अकोला द्वारे

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
पिडीकेव्ही रिसर्च व इन्क्युबेशन फाऊंडेशन अकोला द्वारे अॅग्री स्टार्टअप साठी क्षमता बांधणी कार्यक्रमाचे आयोजन

पिडीकेव्ही रिसर्च व इन्क्युबेशन फाऊंडेशन अकोला द्वारे अॅग्री स्टार्टअप साठी क्षमता बांधणी कार्यक्रमाचे आयोजन

पिडीकेव्ही रिसर्च व इन्क्युबेशन फाऊंडेशन, अकोला द्वारे अँग्री स्टार्टअप साठी क्षमता बांधणी कार्यक्रमाचे आयोजन दि. ३० ऑगस्ट २०२२ रोजी डॉ. पंदेकृवि अकोला येथे करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. व्हि. एम. भाले, मा. कुलगुरु डॉ.पंदेकृवि,अकोला यांचे मार्गदर्शनात करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन डॉ. पी. के. नागरे, सहयोगी अधिष्ठाता, कृषि

महाविद्यालय, अकोला हे होते. तर उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एस. बी. वडतकर, अधिष्ठाता, कृषि अभियांत्रिकी विद्याशाखा, अकोला हे होते.It was Faculty of Agricultural Engineering, Akola. यावेळी कार्यक्रमाचे मार्गदर्शक वक्ते श्री. राम ठक्कर कंपनी सेक्रेटरी अकोला व श्री. मिथुन टेकाडे, सी. ए. अकोला हे या प्रंसगी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. एस. आर. काळबांडे,

यांनी या कार्यक्रमाचे आयोजन अॅग्री स्टार्टअपला कंपनीचे प्रकार व कंपनीची स्थापना करण्याची प्रक्रिया तसेच इनकम टॅक्स फायलींग संबंधी प्रक्रियेची माहिती स्टार्टअप, नवउद्योजक तसेच विद्यार्थ्यांना मिळावी, यासाठी करण्यात आल्याचे सांगितले. तसेच अॅग्री स्टार्टअप यांनी विद्यापीठामध्ये उपलब्ध प्रयोगशाळा, फॅब्रिकेशन

सुविधा, विविध विषयांचे शास्त्रज्ञांचं तांत्रिक मार्गदर्शन ई. सुविधांचा लाभ घ्यावा,असे सांगितले.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ.पी.के.नागरे,सहयोगी अधिष्ठाता, कृषि महाविद्यालय,अकोला यांनीआपल्या जवळील व्यवसायाच्या कल्पनेचे रुपांतर स्टार्टअपमध्ये व त्याची वाढ करण्यासाठी इन्क्युबेशन सेंटरची भुमिका मोठी असल्याचे त्यांनी सांगितले.कृषि क्षेत्रात व्यवसायाच्या भरपुर संधी असुन हळद प्रक्रिया, रोपवाटीका

यामध्ये उद्योगास सद्यस्थितीत वाव असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एस. बी. वडतकर, Dormitory, कृषि अभियांत्रिकी विद्याशाखा, अकोला यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यवसायिक कल्पनेमध्ये नाविन्यपुर्तता असल्यास स्टार्टअपला त्याचा फायदा होतो. त्यामुळे नाविन्यपुर्ण कल्पना

असल्यास स्टार्टअपसाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.महेंद्रसिंह राजपुत यांनी केले व आभार प्रदर्शन डॉ.राजेश मुरूमकार यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी श्री.सागर पाटील व सर्व कर्मचारी पिडीकेव्ही रिसर्च व इन्क्युबेशन फाऊंडेशन अकोला यांनी विशेष परिश्रम घेतले.

English Summary: Capacity Building Program for Agri Startups Organized by PDKV Research and Incubation Foundation Akola Published on: 30 August 2022, 08:51 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters