1. बातम्या

Crop News:कुचींदा मिरचीला जीआय टॅग मिळण्याची शक्यता, शेतकऱ्यांना होईल याचा फायदा

भाजीपाला वर्गीय पिकांमधील सर्वात महत्वाचे पीक म्हणून मिरची या पिकाकडे पाहिले जाते. भारतात आणि महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
can soon get gi tag to kuchinda chilli in odisha state so get more advantage to farmer

can soon get gi tag to kuchinda chilli in odisha state so get more advantage to farmer

भाजीपाला वर्गीय पिकांमधील सर्वात महत्वाचे पीक म्हणून मिरची या पिकाकडे पाहिले जाते. भारतात आणि महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.

मिरचीची बऱ्याच प्रकारच्या जाती आहेत. त्यामध्ये त्या मिरचीच्या जातींच्या वैशिष्ट्यानुरूप विविध प्रकार पडतात. त्यासोबतच दररोज वापरायचा एक पदार्थ म्हणून मिरची कडे पाहिले जाते.

या पार्श्वभूमीवर जर आपण भारतातील ओडिसा या राज्याचा विचार केला तर तेथील शेतकरी जास्त प्रमाणात कुचींदा मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. अशा शेतकऱ्यांना आता एक आनंदाची बातमी लवकर मिळण्याची शक्यता असून कुचींदा मिरचीला जीआय टॅग देण्याची तयारी सुरू आहे.

हा जीआय टॅग या मिरचीला मिळाल्यामुळे येथील शेतकऱ्यांना फायदा मिळून या मिरचीला एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे. त्यामुळे या मिरचीचे उत्पन्न तर वाढेलच परंतु शेतकऱ्यांना देखील चांगल्या उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होईल.

कुचींदा मिरचीला जीआय टॅग देण्याचा प्रशासकीय उपक्रम यापूर्वी सुरू झाला असून या अंतर्गत या मिरचीचे काही नमुने ओडिषा रुरल डेव्हलपमेंट अँड मार्केटिंग सोसायटीने मसाले बोर्डाचे संलग्न असलेल्या एस जी एस लॅब मध्ये चाचणीसाठी  पाठवले होते.

नक्की वाचा:कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त नफा, युकॅलिप्टस ( निलगिरी ) देईल शेतकऱ्यांना लॉंग टर्म नफा

या लॅबच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, ओडिशा बाइट्स च्या बातमीनुसार तिखटपणा आणि इतर लक्षणांच्या बाबतीत कुचींदा मिरची देशातील इतर जी आय टॅग मिळालेल्या मिरचीच्या जाती पेक्षा खूप चांगली आहे.

 कुचींदा मिरचीला अनेक दिवसांपासून आहे भरपूर मागणी

 येथील एका स्थानिक टीव्ही चॅनलने कुचींदा रेगुलेटर मार्केट कमिटीचे सचिव मनोज महंता यांच्या हवाल्याने सांगितले की, आम्ही कोची येथील एसजीएस प्रयोगशाळेत कुचींदा मिरचीचे काही नमुने पाठवले आहेत आणि त्याचे परिणाम खूप उत्साह वर्धक आले. या मिरचीचा तिखटपणा आणि इतर गुणधर्म इतर मिरची पेक्षा  खूप चांगले आहेत.

कुचींदा येथील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मिरचीला राज्य सरकारचे पाठबळ आणि विपणन सुविधा नसल्यामुळे दर्जेदार असूनही राष्ट्रीय आंतराष्ट्रीय बाजारपेठेत बऱ्याच  काळापासून खरी ओळख मिळाली नाही.

सिंचनाच्या सुविधापासून वंचित असलेल्या भागातील शेतकरी नगदी पीक म्हणून पिकवल्या जाणाऱ्या कुचींदा मिरचीला शेजारील राज्यांमध्ये दीर्घकाळापासून मागणी आहे.

नक्की वाचा:मिरचीच्या 'या' जातींची लागवड करा अन मिळवा भरघोस उत्पादन आणि नफा

नक्की वाचा:सावकारांच्या पाशात अडकता शेतीसाठी कर्ज हवे असेल तर पटकन बनवा किसान क्रेडिट कार्ड,ही आहे पद्धत

English Summary: can soon get gi tag to kuchinda chilli in odisha state so get more advantage to farmer Published on: 13 June 2022, 08:42 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters