मागील काही दिवसांचा विचार केला तर टोमॅटोचे दर घसरल्याने टोमॅटोचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले.शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च ही निघाला नाही. बहुतेक शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून देणे पसंत केले.
परंतु पुन्हा एकदा आता टोमॅटोचे दर वाढताना दिसत आहेत. दर पुण्याचा विचार केला तर टोमॅटोचे दर 35 रुपयांवर गेले आहेत. या दिवसात टोमॅटोचे शक्यता किंमत 20 ते 35 रुपये प्रति किलो झाली आहे.
ऑगस्टमध्ये उत्पादनात प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याने टोमॅटोचे दर लक्षणीय घटले त्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटोचे पीक रस्त्यावर फेकले होते. परंतु आता काही दिवसात टोमॅटोचे दर आणखी वाढणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
कांद्याच्या दरातही होऊ शकते वाढ
टोमॅटो सोबतच कांद्याच्या दरहीवाढू शकतात कारण झालेल्या अति पावसामुळे कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले.शेतकरी राजा ने जो कांदा साठवून ठेवलेला आहे तोही ओलाव्यामुळे सडू लागला आहे.त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली आहे.या पार्श्वभूमीवर कांद्याच्या दरात सुधारणा होऊ शकते.अशी परिस्थिती आहे.राजधानी दिल्ली चा विचार केला तर दिल्लीमध्ये कांद्याची किंमत50 ते 55 रुपये प्रतिकिलो वर पोहोचली आहे.याबाबतीत तज्ञांचं मत आहे की येत्या काही दिवसांमध्ये कांद्याच्या भावात सुधारणा होऊ शकते.
एपीएमसी वाशी मार्केटचा विचार केला तर या मार्केटमध्ये 140 ट्रक आणि टेम्पो रोज येतात.परंतुकाही दिवसांपासून कांद्याच्या पुरवठ्यात लक्षणीय घट झाली आहे.
वाशी मार्केटमधून मुंबई महानगर विभागात अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा होतो परंतु सध्या कांद्याचा पुरवठा प्रचंड प्रमाणात घटला आहे. चांगल्या दर्जाचा कांदा अजूनही मार्केटमध्ये येत नाही.नवीन कायद्याचा विचार केला तर तो ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात येईल.परंतु तोही पावसाने खराब झाला आहे.ही सगळी परिस्थिती पाहता कांद्याचे भाव लवकरच घसरण्याची शक्यता फारच कमी आहे असे जाणकारांचे म्हणणे आहे
Share your comments