1. बातम्या

शिंदे-फडणवीस सरकारचा उद्या होणार मंत्रिमंडळ विस्तार; ही नावं निश्चित...

राज्यात भाजप आणि बंडखोर गटाचे सरकार स्थापन होऊन सव्वा महिना झाला तरी मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. आता उद्या शिंदे फडणवीस सरकारचा (Shinde Fadnavis Government) मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Cabinet expansion Shinde-Fadnavis government

Cabinet expansion Shinde-Fadnavis government

राज्यात भाजप आणि बंडखोर गटाचे सरकार स्थापन होऊन सव्वा महिना झाला तरी मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. आता उद्या शिंदे फडणवीस सरकारचा (Shinde Fadnavis Government) मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

या सर्वांमध्ये आता गेल्या महिनाभरापासून रखडलेला शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या होणार असल्याचे सांगितले जात आहे. आता मंत्रिमंडळ विस्तार हा उद्याच होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळात काही जुन्या तर काही नव्या नावांना संधी मिळणार आहे.

भाजपमधील कुरघोड्यांच्या राजकारणामुळेही विस्तार रखडल्याची चर्चा असताना, काही दिवसांपूर्वी लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले होते.

भाजपकडून कुणाला संधी मिळू शकते?

1. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)
2. गिरीश महाजन (Girish Mahajan)
3. प्रवीण दरेकर (Pravin Darekar)
4. राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)
5. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)
6. आशिष शेलार (Ashish Shelar)
7. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)

हे ही वाचा: LIVE Breaking News: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर पुढील सुनावणी सोमवारी होणार

शिंदे गटाकडून

1. दादा भुसे (Dada Bhuse)
2. गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)
3. शंभूराज देसाई (Shambhuraj Desai)
4. अब्दुल सत्तार (Abdul Sattar)
5. उदय सामंत (Uday Samant) यांना संधी मिळू शकते.

हे ही वाचा: ब्रेकिंग! यंदा उसाला मिळणार 3 हजार 50 रुपयांची FRP, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
हे ही वाचा: खासदारांकडून टाळ्यांचा कडकडाट, सभापतींकडून कौतूक, खासदार हरभजन सिंगने केला महत्वाच्या मुद्दा उपस्थित

English Summary: Cabinet expansion Shinde-Fadnavis government tomorrow Published on: 04 August 2022, 12:40 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters