किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान

26 February 2019 08:08 AM


नवी दिल्ली:
शेतकऱ्यांना आर्थिक आणि जल सुरक्षा पुरवण्याच्या उद्देशाने, किसान उर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान सुरु करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने मंजुरी दिली आहे.

प्रस्तावित योजनेचे तीन घटक:

  • घटक अ- नवीकरणीय उर्जा सयंत्रेभूमीवर निर्माण करण्यात आलेल्या 10,000 मेगावॅटच्या विकेंद्रीकृत ग्रीडशी जोडणे.
  • घटक ब- सौर उर्जेवर चालणारे 17.50 लाख कृषी पंप बसवणे.
  • घटक क- 10 लाख ग्रीडशी जोडलेल्या सौर उर्जेवर चालणाऱ्या कृषी पंपांचे सौरकरण 2022 पर्यंत 25,750 मेगावॅट सौर क्षमतेची भर घालण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेसाठी केंद्राकडून एकूण 34,422 कोटी रुपयांचे वित्तीय सहाय्य दिले जाणार आहे.

घटक अ आणि घटक क प्रायोगिक तत्वावर लागू करण्यात येणार आहे. घटक अ अंतर्गत 1,000 मेगावॅट  निर्मिती तर घटक क अंतर्गत 1 लाख कृषी पंप ग्रीडशी जोडले जाणार आहेत. घटक ब अंतर्गत शेतकऱ्याला 7.5 एचपी क्षमतेचे सौर पंप बसवण्यासाठी सहाय्य केले जाईल.

घटक क अंतर्गत शेतकऱ्याला 7.5 एचपी क्षमतेच्या पंपांचे सौरकरण करण्यासाठी सहाय्य केले जाईल. या योजनेमुळे कार्बन उत्सर्जन कमी होऊन पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होणार आहे. या योजनेमधे थेट रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. स्वयंरोजगारात वाढ करण्याबरोबरच कुशल आणि अकुशल कामगारांसाठी 6.31 लाख नवे रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे.

किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान ‎Kisan Urja Surksha Utthan Mahaabhiyan KUSUM yojana कुसुम योजना solar pump सौर पंप
English Summary: Cabinet approval for Farmers Energy Security and Uplift Mission

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.