सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून आयकर विभागाच्या धाडसत्र सुरू आहे. यामुळे याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये पंढरपूरचे अभिजित पाटील सध्या रडारवर आहेत. आता धाराशिव शुगरसह अन्य चार ठिकाणी पडलेल्या आयकर धाडीत काहीच सापडले नाही, असा दावा कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी केला आहे.
अभिजीत पाटील यांच्या ताब्यात असलेल्या पाच साखर कारखाने सध्या लक्ष केले गेले आहेत. (Incom tax Raid) तसेच अन्य ठिकाणी आयकर विभागाच्या वीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाडी टाकुन तीन दिवस चौकशी केली. यामुळे यामध्ये काय हाती लागणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, धाराशिव शुगर शिवाय नाशिक, नांदेड, सांगोला, बीड येथे पाटील यांनी साखर कारखाने घेतले आहेत. यामध्ये तीन भाडेतत्वावर आहेत. मागिल दोन महिन्यापुर्वी लोकशाही मार्गाने पंढरपुर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखाना ताब्यात घेतला आहे. यामुळे याची मोठी चर्चा झाली होती.
दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचा देशपातळीवर सन्मान, शरद पवारांकडून कौतुक
तसेच आयकरची कार्यवाही झाली त्यात गैरमार्ग कुठेही केला नव्हता. जे कारखाने घेतले ते कर्ज काढुन घेतले, त्या कर्जाची नियमीत परतफेड सुरु आहे. यामध्ये कुठेही अवैध पैसा, सोने सापडले नाही, असेही पाटील यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या;
गोकुळ दूध संघाची सभा ठरली वादळी! सतेज पाटील, हसन मुश्रीफांना भिडल्या शौमिका महाडिक..
टोमॅटो 500 रुपये, कांदे 400 रुपये किलो, महागाईमुळे नागरिकांचे मोठे हाल..
आताची मोठी बातमी! पुण्यात दारू बंदी, जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश..
Share your comments