सध्याच्या काळात शेती करणे अवघड झाले आहे. वाढती महागाई, मजुरांची टंचाई, हवामान बदलाचा परिणाम, अवकाळी पाऊस यामुळे शेती तोट्यात चालली आहे. तसेच शेतीत काम करणाऱ्या मजुरांना महत्त्व आणि प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.
सध्या सकाळीच मजुरांच्या दारी आलिशान कार उभ्या राहत आहेत, आणि शेतात गेले की पिण्याच्या पाण्यासाठी जार आणि दोन वेळा गरमागरम चहाही दिला जात आहे. यामुळे एका मजुरांची मजुरी यासाठीच जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे.
सध्या यांत्रिकीकरण बांधकामाचा वेग वाढला आणि प्रगतीचे चक्र फिरले. युवा वर्ग शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने शहराकडे झुकला. तसा शेतात मजुरांचा तुटवडा भासू लागला. शेतात काम करण्यासाठी मजुरांची टंचाई निर्माण झाली. यामुळे त्यांचे दर देखील वाढले.
'ऊस लागवडीचा खर्च वाढला, साखर उद्योगाकडून शेतकऱ्यांचे शोषण'
परप्रांतीय मराठवाडा, खान्देशमधील मजुरांचे लोंढे येत आहेत. काही जणांनी मजुरीवर शेती विकत घेण्यास सुरुवात केली आहे. द्राक्षे व डाळिंब भागातील कामे अतिशय कसरतीची असल्याने ही कामे परप्रांतीय मजूर धोका पत्करून करतात. यामुळे त्यांना हव्या त्या गोष्टी पुरवाव्या लागत आहेत.
काळ्या गव्हाची लागवड शेतकऱ्यांसाठी ठरतेय वरदान, होतोय बंपर नफा..
बागायतदार मंडळींना मजुरांना शेतात कामाला आणण्यासाठी आपली आलिशान कार घेऊन मजुरांकडे जावे लागते. तसेच गाडी नसेल तर भाडोत्री गाडी घ्यावी लागत आहे. तसेच दोनदा चहाही द्यावा लागतो. सध्या मजुरांचा तुटवडा आहे.
महत्वाच्या बातम्या;
नंदूरबार बाजार समितीत मक्याला विक्रमी दर
डाळींब 251 रुपये किलो, शेतकरी मालामाल
केळीला 700 ते 1500 रुपये दर
Share your comments