देऊळगाव मही शंकर पटाचे उदघाटन करतांना गौरव शिंगणे यांनी केले प्रतिपादन
मागील सात वर्षापासून शंकर पटावर बंदी होती. ही बंदी न्यायालयाने काही दिवसांपूर्वी उठवली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ठीक ठीकाणी शंकरपटाचे आयोजन करण्यात येत आहे. या शंकरपटाच्या माध्यमातून सर्व जाती धर्मातील शेतकरी एकत्र येऊन विचाराची देवान घेवाण तसेच या महाउत्सवातून सामाजिक प्रतिष्ठा तसेच नावलौकिक मिळून बळीराजाचा सामाजिक स्तर उंचावेल
असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गौरव शिंगणे यांनी केले.बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य शंकर पट तसेच लाइ तुलाचे आयोजन करण्यात आले होते. शंकरपटाचे उदघाटन काल शुक्रवार रोजी गौरव शिंगणे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अर्थ व बांधकाम सभापतीया खान पठाण, छत्रपती बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष समाधान भिकाजी शिंगणे पोलीस पाटील रंगनाथ शिंगणे, तंटामुक्ती अध्यक्ष भाजी शिंगणे,
सरपंच रामकासन म्हस्के, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते संजय पाटील, सहकारी दूध संघाचे अध्यक्ष समाधान औधर शिंगणे, बाजार समिती माजी सभापती नितीन शिंगणे, सरपंच भरत पाटील, गजानन चेके, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते गजेंद्र शिंगणे, शंकर शिंगणे, अकिल काझी, संजय शिंगणे, राजुसेठ दूंगरवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी शंकर पट पंच कमेटीच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच या शंकर पटात पाहिला धुरकरी शेतकरी शेख सलीम याचा शाल ऑफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी समाधान शिंगणे यांनी या शंकर पटामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण असून
या शंकर पटाचा सर्व शेतकरी बांधवांनी सहभागण्यावा असे आवाहन केले. त्यानंतर राजेंद्र चित्ते यांनी आपले विचार व्यक्त केले. गुलाब सरोदे, विकास शिंगणे, सचिन शिंगणे अनिल शिंगणे भागळे वसंतराव पाटील उपस्थीत होते.
त्यावेळी बळीराजाचा सामाजिक स्तर उंचावेल असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गौरव शिंगणे यांनी केले.बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य शंकर पट तसेच लाइ तुलाचे आयोजन करण्यात आले होते. शंकरपटाचे उदघाटन काल शुक्रवार रोजी गौरव शिंगणे यांच्या हस्ते करण्यात आले.
Share your comments