देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. 2022-23 च्या आर्थिक अर्थसंकल्पात हरित शेती, हरित ऊर्जा यावर विशेष भर दिल्याची चर्चा होती. शेतकऱ्यांसाठी कृषी वर्धन निधी सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे शेतीशी संबंधित स्टार्टअप्सना प्रोत्साहन दिले जाईल.
यामध्ये मागील आठ वर्षात शेती क्षेत्रासाठी अर्थसंकल्पातील तरतूद वाढवण्यात आली आहे. २०१५ साली ८५ लाख कोटी रुपयांची कृषी क्षेत्राच्या विकासासाठी तरतूद करण्यात आली होती. यंदाच्या अर्थसंकल्पात मात्र कृषी क्षेत्रासाठी तरतूद १८६ लाख कोटी पर्यंत पोहचलही आहे.
प्रामुख्याने कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली. कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात तरतुदी, शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी विशेष निधीची तरतूद, शेती आणि ग्रामीण भागातील स्टार्टअपला चालना, शेतीतील समस्यांवर सहज सर्वसमावेशक अशी माहिती डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध होणार. आत्मनिर्भर भारतअंतर्गत फलोत्पादनाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
गायीच्या दूध खरेदीची स्पर्धा, राज्यात आजपासून सहकारी, खाजगी डेअऱ्यांकडून दूध दरवाढ
फलोत्पादनाचे उत्पादन वाढीवर भर, पशुसंवर्धन, दुगधव्यवसाय आणि मत्स्यपालनासाठी २० लाख कोटींची तरतुद, भरडधान्याला प्रोत्साहन देण्यासाठी 'श्री अन्न' योजना राबवणार, भरडधान्यावर संशोधन करणाऱ्या 'इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मिलेट रिसर्च' संस्थेला मदत करणार, नाशवंत शेतमालाची नासाडी रोखण्यासाठी देशात शीतगृह उभारणार.
शीतगृहाचा वापर शेतकऱ्यांना किफायतशीर उपलब्ध,देशात कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी ३ केंद्र उभारण्यात येणार आहेत. कृषी क्षेत्रातील अडचणीवर कृत्रिम बुद्धीमत्तेच्या जोरावर मात करण्यात येणार. तसेच देशातील धान्य उत्पादन मागील ८ वर्षात २५० दशलक्ष टनांवरून ३१० दशलक्ष टनांवर, अशा अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या;
केळीच्या दरात तेजी, शेतकऱ्यांना दिलासा..
'सरकारचा प्राधान्य हरित विकास', अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी या मोठ्या घोषणा
10 दिवस अधिकाऱ्यांना घरी जाण्यास नसते परवानगी, जगाचा नसतो संपर्क, जाणून घ्या अर्थसंकल्प कसा तयार होतो...
Share your comments