पुणे : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. या जोरदार पावसामुळे नदी, नाले, ओढे भरून वाहत आहेत. या पावसामुळे विविध भागात पूरसदृश परिस्थिती ओढावली आहे. यामुळे पावसाचा वाढता धोका पाहता प्रशासन सज्ज झाले आहे. खबरदारी म्हणून ठिकठिकाणी आधीच एनडीआरएफची टीम पाठवण्यात आल्या आहेत.
राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना रेड, ऑरेन्ज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशाराही दिला आहे. त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये उद्या (14 जुलै) शाळा बंद असणार आहेत. यामध्ये पालिका आणि खासगी शाळांचा समावेश आहे. पुण्यात या पावसामुळे आजही शाळांना सुट्टी देण्यात आली होती. (Warning of heavy rains in various parts of the state; Schools will be closed on Thursday)
हे ही वाचा:
रेशन कार्डचा नवीन नियम आला; 'या' अपात्र शेतकऱ्यांना त्वरित करावं लागणार रेशनकार्ड सरेंडर
नितीन गडकरींनी सांगितला मास्टर प्लॅन; सरकारच्या ‘या’ योजनेतून वाढणार सर्वसामान्यांचे उत्पन्न
कुठे कुठे शाळा बंद राहणार?
नवी मुंबई, वसई, पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शाळा या उद्या बंद राहणार आहे. शासनाने शाळांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. महापालिका प्रशासनाने शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा: रेशन कार्ड धारकांसाठी केंद्र सरकारने केली मोठी घोषणा; लाभार्थ्यांना होणार फायदाच फायदा..
नवी मुंबईतही शाळा बंद
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आणि विद्यालयांना गुरुवारी 14 जुलैला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय अतिवृष्टीची परिस्थिती यापुढेही अशीच राहिल्यास शाळेस सुट्टी घेण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापनाला देण्यात आल्याची माहिती शिक्षण उपायुक्त जयदीप पवार यांनी दिली.
हे ही वाचा:
शेतकरी मित्रांनो, पेरणीपूर्वी करा फक्त 'हे' काम; लाखों रुपयांनी वाढणार उत्पन्न..
कामठी सोसायटीच्या चेअरमन पदी गणेश आरडे यांची निवड
Share your comments