राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे. पक्षाचे महाराष्ट्र राज्याबाहेर एकमेव खासदार असलेले लक्षद्विप लोकसभा मतदारसंघातून मोहम्मद फैजल यांना 10 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
ते राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आलेले आहेत. त्यांना खून करण्याच्या प्रयत्नासाठी लक्षद्वीपमधील कवरत्ती जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यामुळे राष्ट्रवादीचा राज्याबाहेरतील हा खासदार अडचणीत आला आहे.
त्यांना २००९ मध्ये झालेल्या प्रकरणात त्यांच्यासह तीन जणांना ही शिक्षा सुनावली आहे. त्यांना कोर्टाने एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. मोहम्मद फैजल हे शरद पवार यांच्या जवळचे सहकारी मानले जातात.
ब्रेकिंग! कारखाना घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची छापेमारी
यामुळे त्यांना हा एक मोठा धक्का मानला जात आहे. खासदार मोहम्मद फैजल आणि इतर तीन आरोपींनी माजी केंद्रीय मंत्री पीएम सईद यांचे जावई पदनाथ सालेह यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता.
याबाबत खासदार मोहम्मद फैजल यांनी सांगितले की, ते वरच्या कोर्टात या निर्णयाविरोधात अपील करणार आहेत. जर उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवला तर त्यांना आपली खासदारकी गमवावी लागू शकते.
मोठी बातमी! प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडूंचा अपघात, दुचाकीने दिली धडक
तसेच माझ्यावर राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई होत असल्याचा आरोप यावेळी फैजल यांनी केला. यामुळे आता पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी मात्र हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
महत्वाच्या बातम्या;
घरात फक्त दोनच बल्प आणि बिल आलंय 34 हजार, महावितरणचा अजब कारभार
'ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अंतिम हप्ता मिळणेसाठी तातडीने ऊस दर नियंत्रण स्थापन करा'
Livestock Market : बंदी उठवल्याने जनावरे बाजार पूर्ववत, शेतकऱ्यांना दिलासा..
Share your comments