1. बातम्या

ब्रेकिंग! भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे निधन

गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत असलेल्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले आहे. पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाच्या त्या भाजपच्या विद्यमान आमदार होत्या.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
mla mukta tilak passed away

mla mukta tilak passed away

गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत असलेल्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले आहे. पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाच्या त्या भाजपच्या विद्यमान आमदार होत्या.

पुण्याच्या महापौर म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या मुक्ता टिळक यांनी पुण्यात अनेक सामाजिक उपक्रम राबवले होते. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या.

राज्यसभा निवडणुकीच्यावेळी त्यांना मतदानासाठी मुंबईत एअरअॅम्ब्युलन्सनं नेण्यात आलं होतं. सन २००२ साली मुक्ता टिळक यांनी पहिली निवडणूक लढवली. महापालिका निवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा मान त्यांच्या नावावर आहे.

कोरोना पुन्हा वाढला! केंद्रीय मंत्र्यांचे मास्क सक्तीबाबत मोठे वक्तव्य

भाजपने त्यांना सन २०१९ मध्ये कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली आणि त्या आमदार झाल्या. मात्र त्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. अखेर आज त्यांचे निधन झाले आहे.

जनावरांचा बाजार शुक्रवारपासून सुरू, शेतकरी व्यापाऱ्यांना दिलासा..

त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील भावे स्कूलमध्ये झाले आणि त्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी पदवी घेतली. मानसशास्त्र या विषयातून त्यांनी एमए केलं पुढे त्या एमबीए देखील झाल्या.

महत्वाच्या बातम्या;
मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे निलंबन, अध्यक्षांबाबत केलेलं वक्तव्य आले अंगलट
शेतकऱ्यांनो सौर शेतीत मोठी संधी, केंद्र सरकारचे २५ हजार मेगावॉट सौरऊर्जा तयार करण्याचे उद्दिष्ट
शेतकरी नेते राजू शेट्टी यांची केंद्रीय मंत्र्यांकडे तक्रार, विमान प्रवासात घडला धक्कादायक प्रकार

English Summary: Breaking! BJP MLA Mukta Tilak passed away Published on: 22 December 2022, 05:15 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters