मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असून सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दिवाळीनंतर या निवडणुकाला मुहूर्त मिळणार असल्याचं बोललं जात आहे. (Mumbai Municipal Corporation Elections)
"भाजपकडून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा प्लॅन केला जात, असून मुंबईत कदाचित दंगल घडवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे." असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी भाजपवर केला आहे. रत्नागिरीतील गुवागर येथे झालेल्या शिवसेनेच्या (Shiv Sena) एका सभेत बोलतताना हा आरोप केला आहे.
हेही वाचाच: पाचुपते यांच्यासह नागवडे गटाला धक्का; श्रीगोंदा तालुक्यासाठी पवारांनी आखली रणनीती..
ठाकरे गटाचे (Thackeray group) नेते भास्कर जाधव यांनी भाजप वर गंभीर आरोप केले आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. यासाठी भाजपने मोठं प्लॅनिंग केलं असून महापालिका जिंकण्यासाठी त्यांच्याकडून दंगल घडवली जाऊ शकते असा आरोप भास्कर जाधवांकडून करण्यात आला आहे. त्याचबरोबर नारायण राणे आणि शिंदे गटात गेलेल्या रामदास कदम यांच्यावरही त्यांनी हल्लाबोल केला आहे.
हेही वाचाच:खवय्यांसाठी आनंदाची बातमी: आता वर्षभर कोकणच्या 'हापूस'ची चव चाखता येणार
Share your comments