सध्या राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. सध्या भाजपने अनेक घडामोडी करत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले असून उपमुख्यमंत्रीपद आपल्याकडे ठेवले आहे. आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत असून खातेवाटपाची सध्या चर्चा सुरू आहे. भाजपकडून शिवसेनेला धोबीपछाड देण्यासाठी अनेक राजकीय डाव आखले जात आहे. अशातच अजून एक मोठी बातमी समोर येत आहे. यामुळे याची सध्या चर्चा सुरु आहे.
सध्या राष्ट्रपती पदाची निवडणूक काही दिवसांवर आली आहे. शिवसेनेने भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी काही शिवसेना खासदार करत असतानाच एक महत्वाची घडामोड समोर आली आहे. असे असताना आता उपराष्ट्रपतीपदासाठी भाजप केंद्रीय नेतृत्व एका माजी शिवसैनिकाला उमेदवारी देण्याच्या विचारात असल्याचे समजते. यामुळे चर्चा सुरु आहे.
सध्या शिवसेनेत मोठा वाद सुरु आहे. शिवसेनेत सध्या उभी फूट पडलेली असताना याचा परिणाम आगामी निवडणुकांवर देखील पाहायला मिळू शकतो. यामध्ये आता माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांचे नाव उपराष्ट्रपतीपदासाठी सध्या चर्चेत आले आहे. प्रभू मूळचे शिवसेनेचे नेते, पण मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी अगदी ऐन वेळी त्यांना भाजपमध्ये सामावून घेण्यात आले. तसेच सुरेश प्रभू यांनी मोदी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळात रेल्वे खात्याची जबाबदारी सांभाळली होती.
भीमाशंकर कारखान्याच्या 18 जागा बिनविरोध, एका अपक्षामुळे लागली निवडणूक
तसेच ते अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळातही मंत्री होते. त्यांना मोठा राजकीय अनुभव देखील आहे, हाच अनुभव आणि जेष्ठत्व यामुळे भाजप त्यांच्या नावाचा विचार करत असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. असे केल्यास शिवसेनेने साथ सोडूनही भाजप जुन्या शिवसैनिकांना विसरलं नसल्याचा संदेश शिवसेना कार्यकर्त्यांपर्यंत जाऊ शकतो. यामुळे आता काय होणार हे लवकरच समजेल.
महत्वाच्या बातम्या;
राजकारणातील सर्वात मोठी बातमी! संजय राऊतांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
शिंदे सरकारचा अजित पवारांना दे धक्का! घेतला मोठा निर्णय..
फक्त 150 रुपयांमध्ये मिळवा 19 लाख! LIC ची भन्नाट पॉलिसी, जाणून घ्या..
Share your comments