गेल्या काही दिवसांपासून आसाममध्ये जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. असे असताना आता पुराची स्थिती पाहण्यासाठी राजकीय नेतेही पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी येत आहेत. यामुळे याचे फोटो व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
याबाबत एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजप आमदार पुराच्या पाण्यातून वाचण्यासाठी बचाव पथकातीलच एका कर्मचाऱ्याच्या पाठीवर बसून जाताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. यामुळे या आमदारावर टीका केली जात आहे.
येथील लुमडिंग विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार सिबू मिश्रा हे पूरग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी गुडघ्यापेक्षा जास्त पाणी असलेल्या भागात ते जात असताना बचावकार्य करणाऱ्या एका जवानाच्या पाठीवर बसून पाण्यात गेले. याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
नारळाची शेती देखील धोक्यात, 'या' पद्धतीने करा योग्य व्यवस्थापन
यामुळे ते वादात सापडले आहेत. दरम्यान, पावसामुळे सध्या आसामला मोठा दणका बसला आहे. धुवांधार पावसामुळे महापुराची स्थिती निर्माण झाली असून दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले आहे. यावेळी लाखो लोकांना महापुराचा फटका बसला आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
सध्या याठिकाणी पुरात अडकेलल्या नागरिकांना मदत करण्यासाठी बचावपथके काम करत आहेत. २७ जिल्ह्यातील साडेसहा लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. यामध्ये काही लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत जवळपास ५० हजार नागरिकांचे सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या;
मोठी बातमी! राज्यात पुन्हा शेतकऱ्यांनाचा संप? सोमवारी होणार मोठा निर्णय
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा! शेतकऱ्यांना देणार मोफत भाज्या, कडधान्य..
40 गोणी कांदा, शेतकऱ्याला आडतवाल्यालाच द्यावे लागले 7 रुपये, सांगा कसा जगणार शेतकरी
Share your comments