शेतकऱ्यांच्या मागे लागलेली साडेसाती काही केल्या कमी होताना दिसत नाही. आता भाजप गवता'चा (Bjp Gras) मोठ्या प्रमाणावर फैलाव झाल्याचे चित्र दिसत आहे. राज्याच्या विविध भागात शेतीच्या बांधावरच नाही, तर शेतात देखील भाजप गवताचे प्रमाण वाढलं आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
या भाजप गवतालाच 'चिमुक काटा' असेही म्हणतात. या विदेशी गवताला शेतकऱ्यांनी नवीन ओळख दिली. भाजप गवताची ओळख ही अलीकडची नाही तर गेल्या तीन-चार दशकांपासून आहे. पण अलीकडे मोठ्या प्रमाणावर बांधावर, शेतात आणि मोकळ्या जागेवर वाढ झाल्याने हे गवत सर्वत्र चर्चेला येते.यावर काही औषधे देखील आहेत, मात्र ती फारशी प्रभावी नाहीत.
तरुण शेतकरी या गवताला 'भाजप गवत' असेच म्हणतात. तरुण शेतकऱ्यांना या गवताचे मूळ आणि उपयोग असे काहीही माहीत नाही. मात्र काँग्रेस गवत कमी होऊन हे भाजप गवत वाढल्याचे शेतकऱ्यांना सांगितले. यामुळे याचा राजकीय अर्थ अनेकजण काढून हसू लागतात. पहिलं पिकांमध्ये काँग्रेस गवत येत होते. हे गवत मोठ्या प्रमाणात पसरत होते. हे गवत पिकाला लागणारे घटक शोषूण घ्यायचे.
'शेतकऱ्यांची फसवणूक करू नका, नाहीतर 16 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांचा घरावर धडकणार'
एका शेतकऱ्याच्या शेतातून दुसऱ्या शेतात या गवताचे बी जात होते. फवारण्या केल्याने काही किडे सोडल्याने काँग्रेस गवताचे प्रमाण कमी झाले. मात्र, आता नवीन भाजप गवत झपाट्यानं वाढत आहे. हे गवत काढताना याचे काटे टोचतात. या गवताच्या आजूबाजूला कोणतेही पीक येत नाही. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बागायती परिसरातील गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बांध, शेतात, मोकळ्या जागेत आणि पिकांमध्ये भाजप गवत मोठ्या प्रमाणात वाढलं आहे.
सीबीलमुळे शेतकऱ्याचे कर्ज मंजूर न केल्यास तक्रार कोणाकडे करावी? सरकार आदेशाला बँकांकडून केराची टोपली
अहमदनगर, शेवगाव, पाथर्डी, शिरुर कासार, बीड, केज, जामखेड, आष्टी, जालना, औरंगाबाद, लातूर आणि उस्मानाबाद या भागात देखील भाजप गवताचे प्रमाण वाढले आहे. सगळ्याच पीकामध्ये विशेषत: खरीप पिकामध्ये भाजप गवताचे प्रमाण वाढले आहे. जिथे पाण्याचे प्रमाण जास्त आहे तिथे हे गवत जास्त प्रमाणत वाढते.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती! सुक्ष्मजीव करतात वनस्पतीच्या अन्नाचे व्यवस्थापन
काटामाऱ्यांनो तुमचे दिवस संपले! उसाच्या वजनातील झोल रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय
चिंता वाढली! चीनमध्ये धुमाकूळ घातलेला व्हेरिएंट मुंबईत दाखल, पहिल्यांदाच आढळेल 3 रुग्ण
Share your comments