सणासुदीच्या काळात सर्व सामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. खाद्य तेलाच्या किमती (Edible oil prices) कमी करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. माहितीनुसार खाद्यतेलाचा आढावा घेण्यासाठी अन्न सचिवांनी काल ४ ऑगस्ट रोजी खाद्यतेल कंपन्यांसोबत बैठक झाली आहे.
सरकार कंपन्यांना 10 रुपयांपर्यंत किंमत कमी करण्यास सांगू शकते. याचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे. कारण अनेक महिन्यांपासून तेलाच्या किमती स्थिर आहेत. मात्र, काही दिवसांपासून दरात घट दिसून येत आहे. पण, सणांवर टंचाईचा परिणाम आणखी काही खास दिसून येईल. खाद्यतेलाचे दर कमी करण्यात सरकारला यश आल्यास सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Insecticide: शेतकरी मित्रांनो घरीच बनवा नैसर्गिक किटकनाशक; पैशांची होईल मोठी बचत
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक सातत्याने हा मुद्दा उपस्थित करत असून, महागाईच्या मुद्द्यावरून अनेक दिवसांपासून संसदेचे कामकाज सुद्धा विस्कळीत झाले आहे. गुरुवारी अन्न सचिवांशी झालेल्या बैठकीनंतर खाद्यतेल सुमारे 8 ते 10 रुपयांनी स्वस्त होऊ शकते, असे म्हटले जात आहे. तेलाच्या किमती (Oil prices) कमी करण्यासाठी आधीपासूनच तयारी सुरू आहे.
Insurance Policy: फक्त 20 रुपयांमध्ये मिळवा 2 लाख रुपयांपर्यंत विमा; जाणून घ्या प्रोसेस
सरकारने आधीच कंपन्यांना किमती कमी करण्यास सांगितले आहे. त्यामुळे 200 रुपये लिटरने विकले जाणारे मोहरीचे तेल 160-170 रुपयांवर पोहोचल्याचे दिसून आले. गेल्या महिन्यात कंपन्यांनी किमतीत 20 ते 25 रुपयांनी कपात केली आहे. त्याचा परिणाम किरकोळ बाजारातही दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या
MSEDCL: शेतकऱ्यांना मोठा दिलासा; राज्यात 24 तास वीज पुरवठा होणार, जाणून घ्या
PM Suraksha Bima Yojana: महिन्याला फक्त 1 रुपया जमा करा; सरकार देतंय 2 लाखांचा लाभ
Agricultural Business: शेतकरी मित्रांनो पावसाळ्यात शेतीच्या बांधावर लावा 'ही' झाडे; मिळेल भरघोस उत्पन्न
Share your comments