wheat rate
गेल्या वर्षी अर्थात 2021 मधील खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे खरिपातील सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले होते यामुळे खरीप हंगामात शेतकर्यांना कवडीमोल उत्पन्न मिळाले. खरीप हंगामात झालेले नुकसान शेतकरी बांधवांनी कसेबसे पचवले आणि रब्बी हंगामाकडे वाटचाल केली. मात्र रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच निसर्गाच्या लहरीपणाचा प्रत्येय शेतकरी बांधवांना आला. असे असले तरी सुरवातीला असलेला निसर्गाचा लहरीपणा जास्त काळ टिकला नाही.
त्यानंतर रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक वातावरण तयार झाले. मात्र, निसर्गाचा लहरीपणा रब्बी हंगामातील पिके अंतिम टप्प्यात असताना देखील बघायला मिळाला. रब्बी हंगामातील पिके ऐन काढणीच्या अवस्थेत असताना ढगाळ वातावरण राज्यात तयार झाले. मात्र अवकाळीने यावेळी शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घेतली आणि ढगाळ वातावरण निवळले. असे असले तरी, शेतकऱ्यांच्या पुढ्यात असलेली संकटाची मालिका अजूनही कायम आहे कारण की, आता रब्बी हंगामातील शेतमालाच्या बाजार भावात मोठी कपात झाली आहे.
रब्बी हंगामात गव्हाचे पीक हे मुख्य पीक असते काढणीपर्यंत गव्हाला चांगला विक्रमी दर देखील मिळत होता, पण पिकाची काढणी झाल्यानंतर दरात मोठी कपात झाली. सुरुवातीला दिनाचा रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होणार आहे सध्या 2300 रुपये प्रति क्विंटल या दराने विक्री होत आहे.
अर्थातच गव्हाच्या दरात तब्बल सातशे रुपये प्रति क्विंटल एवढे घट झालेली आहे. यामुळे गहू उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा भयान संकटात सापडला आहे. सध्या गव्हाच्या दरात अस्थिरता असल्याने गहू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये गहू विक्री करावा की साठवणूक करावी याबाबत संभ्रमावस्था बघायला मिळत आहे.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी गव्हाला मोठी मागणी बघायला मिळाली, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे ही मागणी वाढत असल्याचा अंदाज तज्ञाकडून वर्तविण्यात आला होता. मागणी वाढली असली तरी गव्हाच्या दर तीन हजार रुपये प्रति क्विंटल एवढे होते.
मात्र आता यात मोठी घट झाली असून गव्हाचे दर 1900 रुपये प्रतिक्विंटल ते 2300 रुपये प्रति क्विंटल या दरम्यान बघायला मिळत आहेत. त्यामुळे गव्हाची सुगी झाली खरी मात्र शेतकऱ्यांना सुगीचे दिवस केव्हा प्राप्त होतील हे विशेष पाहण्यासारखे राहिल.
Share your comments