New Delhi : NCERT च्या शालेयपाठ्यपुस्तकात देशाचे नाव आता इंडिया ऐवजी भारत असे नमूद केले जाणार आहे. या इयत्तेतील विद्यार्थ्यांच्या नवीन पाठ्यपुस्तकात हा बदल पहिल्यांदा समोर येणार आहे. 'भारत' शब्दाच्या उल्लेखाच्या प्रस्तावाला NCERT ने मंजुरी दिली आहे. याबाबत ANI ने वृत्तसंस्थेने वृत्त दिलं आहे.
NCERT ने पुस्तक निर्मितीसाठी 19 सदस्यांची समिती नेमण्यात आली होती. NCERT पुस्तकात इंडिया या शब्दाच्या ऐवजी भारत हा शब्द वापरण्यात यावा, या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी आता देण्यात आली आहे. यामुळे आगामी काळात येणाऱ्या पुस्तकात इंडिया या शब्दाच्या ऐवजी भारत हा शब्द वापरण्यात येणार आहेत. यामुळे सर्व पुस्तकात देशाचे नाव बदललेले दिसणार आहे.
एनसीईआरटीच्या इयत्ता 12 वीच्या पाठ्यपुस्तकात हा बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे नवीन पाठ्यपुस्तकात देशाचे नाव भारत ठेवण्याविषयीचा प्रस्ताव देण्यात आला होता. यामुळे आता त्याला मंजूरी देण्यात आल्याची माहिती पाठ्यमंडळाचे संचालक सी आय इसाक यांनी दिली आहे.
G-20 परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेवर भारत उल्लेख
दिल्लीत मागील काही दिवसांपूर्वी जी २० परिषद पार पडली. यावेळी देखील G-20 परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेवर 'भारताचे राष्ट्रपती' असे नमूद करण्यात आले होते. यामुळे देशातील राजकारण चांगलेच तापले होते. मात्र, त्यानंतरही अनेक वेळा इंडियाऐवजी भारत असे लिहिले दिसून आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांच्या नावाच्या फलकावर 'भारताचे पंतप्रधान' असे लिहीण्यात आल्याचे दिसून आले आहे.
Share your comments