राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या 38 दिवसांपासून रखडलेल्या शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे.. मिळालेल्या माहितीनुसार, उद्या (ता. 9) सकाळी 11 वाजता राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असून, राजभवनावर हा शपथविधी सोहळा होणार असल्याचे समजते.
मंत्रीमंडळाचा हा संपूर्ण विस्तार नसून, पहिल्या टप्प्यात साधारण 15 मंत्र्यांचा शपथविधी होईल.In the first phase, around 15 ministers will be sworn in. मंत्रिमंडळात स्थान दिल्या जाणाऱ्या आमदारांना आज (ता. 8) सायंकाळपर्यंत मुंबईत पोचण्याचे निरोप पाठवल्याचे समजते. त्यामुळे या मंत्रिमंडळात नेमकी कुणाची वर्णी लागते, याकडे राज्याचे लक्ष लागलंय.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर लगेच उद्या (मंगळवारी) सायंकाळी मंत्र्यांना खातेवाटप होणार असून, बुधवारी (ता. 10) कॅबिनेटची बैठकही होणार आहे.. तसेच येत्या 10 ते 17 ऑगस्ट दरम्यान राज्याचं पावसाळी अधिवेशन पार पडणार असल्याचं समजतंय.. त्यामुळे या अधिवेशनापूर्वीच म्हणजे उद्याच (ता. 9) मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
शिंदे सरकारमधील एकूण 15 आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. त्यात भाजपचे 8, तर शिंदे गटातील 7 आमदारांचा समावेश असल्याचं सांगितलं जातं. शिंदे गटाकडून माजी मंत्र्यांना, तर भाजपकडून विधानसभेतील आमदारांना मंत्रीपदाची आधी संधी मिळणार असल्याचं समजतं.. अर्थात, शपथविधीच्या दिवशीच नेमकं चित्रं स्पष्ट होणार आहे.
संभाव्य मंत्रिमंडळ भाजप देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील जयकुमार रावलराधाकृष्ण विखे पाटील प्रवीण दरेकर रवींद्र चव्हाण नीतेश राणे शिंदे गट गुलाबराव पाटील दीपक केसरकर दादा भुसे अब्दुल सत्तार शंभूराजे देसाई संजय शिरसाठ संदीपान भुमरे
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर आज विधान भवनाबाहेरील पोलिस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आलीय. विधान भवनात जाण्यासाठी सामान्य नागरिकांना मज्जाव केला जात आहे. पूर्ण चेकींग करुनच नागरिकांना सोडलं जात आहे. सुप्रिम कोर्टाचा निर्णय येण्यास उशीर लागण्याची शक्यता
असल्याने शिंदे सरकारचा विस्तार होणार असल्याचे समजते.दरम्यान, विधी मंडळ सचिवांची आज महत्वाची बैठक झाली. त्यात राज्याच्या पावसाळी अधिवेशनावर चर्चा झाली. राज्याचे पावसाळी अधिवेशन येत्या 10 ते 17 ऑगस्टपर्यंत घेण्याचे बैठकीत ठरल्याचं सांगण्यात येत आहे..
Share your comments