शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात दररोज मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेनेतील आमदार फोडून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपसोबत (BJP) सरकार स्थापन केले. शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्या आमदारांनंतर (MLA) आता खासदारांवर (MP) कारवाई सुरूच आहे.
बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव (MP Prataprao Jadhav) यांची शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत एक जिल्हाप्रमुख, 2 उपजिल्हाप्रमुख आणि 3 तालुकाप्रमुखांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. बुलडाणा (Buldana) जिल्ह्यातील २ आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव हेही शिंदे गटात दाखल झाले. त्यामुळे जाधव यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
बुलडाणा जिल्हा संपर्क प्रमुख तथा खासदार प्रतापराव जाधव यांनी पक्ष विरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून जाधव यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे, असं शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मधून जाहीर करण्यात आले आहे.
राजकारणात खळबळ! एकनाथ शिंदेंचा मोठा दावा; निवडणूक आयोगासमोर ५० आमदारांसह...
प्रताप जाधवांवर कारवाई
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मुंबईत गेलेल्या शिंदे गटांच्या ४० आमदारांची मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक पार पडली होती. या बैठकीत दिल्लीहून सेनेचे 12 खासदार ऑनलाईन उपस्थित होते. विशेष म्हणजे, त्यात बुलडाण्याचे सेना खासदार प्रतापराव जाधव यांचा समावेश होता.
एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात 11 खासदार होते. पण, दोन तृतीयांश आकडा गाठण्यासाठी एका खासदाराची गरज होती. यावेळे प्रतापराव जाधव हजर होते. त्यामुळे प्रताप जाधव यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
मोठी बातमी! निवडणूक आयोगाचे ठाकरे आणि शिंदे गटाला सत्ता राखण्यासाठी महत्वपूर्ण आदेश; जाणून घ्या...
राजू शेट्टी ॲक्शन मोडमध्ये; उसाप्रमाणे दुधाला हमीभाव जाहीर करावा, नाहीतर...
Share your comments