1. बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारने केली नवीन वर्षात रेशनकार्ड धारकांसाठी मोठी घोषणा..

रेशनकार्ड धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या रेशनकार्ड धारकांसाठी महिन्यातून दोनदा मोफत रेशन मिळत आहे. मात्र, आता प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत रेशन वितरण मोहीम ही मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
ration card

ration card

रेशनकार्ड धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या रेशनकार्ड धारकांसाठी महिन्यातून दोनदा मोफत रेशन मिळत आहे. मात्र, आता प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत रेशन वितरण मोहीम ही मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता शिधापत्रिकाधारकांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. यामुळे अनेकांना याचा फायदा होणार आहे. सध्या उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या निवडणुकांबाबत सरकार अनेक घोषणा करत आहे. केंद्र सरकारच्या गरीब कल्याण योजनेच्या विस्तारानंतर आता उत्तर प्रदेशातील पात्र शिधापत्रिकाधारकांना दरमहा 10 किलो मोफत रेशन मिळत आहे.

यामध्ये आता लाभार्थ्यांना महिन्यातून दोनदा गहू आणि तांदूळ मोफत मिळणार आहे. यामुळे अनेक गरीब नागरिकांना याचा सध्या फायदा होणार आहे. याची मुदत आता दोन महिने वाढवण्यात आली आहे. तसेच डाळी, खाद्यतेल आणि मीठही मोफत दिले जात आहे. कोरोना विषाणूच्या जागतिक महामारीनंतर सरकार गरीब कल्याण योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल गरीब, मजुरांना मदत करत आहे. पीएमजीकेवायचा कालावधी नोव्हेंबरमध्ये संपणार होता, परंतु राज्याच्या योगी सरकारने तो होळीपर्यंत वाढवला आणि मोफत रेशन वितरणाची घोषणा केली.

आता अंत्योदय शिधापत्रिकाधारक आणि पात्र कुटुंबांना डिसेंबरपासून दुप्पट रेशन दिले जात आहे. कोरोना काळात देखील सरकारने अनेकांना राशन दिले होते. कोरोना काळात सर्वकाही ठप्प झाले असल्याने अनेकांच्या हाताला काम नव्हते. आता दिल्लीत राज्यांच्या अन्न मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर ही बैठक बोलावण्यात आली आहे. राज्यांच्या संमतीच्या आधारे केंद्राने तीन आठवड्यांच्या आत सामुदायिक स्वयंपाकघर योजनेचे मॉडेल तयार करावे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.

गुणवत्ता, स्वच्छता, विश्वासार्हता आणि सेवेची भावना या चार स्तंभांवर सामुदायिक स्वयंपाकघरे बांधण्याची गरज असल्याचे केंद्रीय मंत्री म्हणाले. यामुळे, कोणीही उपाशी राहणार नाही हे उद्दिष्ट साध्य करण्यात आम्हाला मदत होईल. असेही म्हणाले. केंद्रीय अन्नमंत्री पियुष गोयल यांनी रेशन दुकानांच्या कक्षेत न येणाऱ्या गरजूंसाठी साधे आणि पारदर्शक सामुदायिक स्वयंपाकघरे उभारण्याच्या योजनेचा विचार करण्यासाठी राज्य अन्न सचिवांचा एक गट स्थापन करण्याची घोषणा यावेळी केली. यामुळे पात्र व्यक्तींना मोठा दिलासा मिळाला आहे.

English Summary: Big news! Modi government made a big announcement for ration card holders in the new year. Published on: 07 February 2022, 09:51 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters