मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Self-Government) निवडणुका ओबीसी आरक्षणाने घ्याव्यात, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. येत्या दोन आठवड्यांत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेशही राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आले. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होत आहे.
आज दुपारी ही पत्रकार परिषद होणार आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोग 367 ठिकाणी निवडणुका (Elections) जाहीर करेल किंवा पावसामुळे निवडणूक कार्यक्रम रद्द करेल किंवा काही जिल्ह्यांमध्ये निवडणुका जाहीर करेल. तसेच आरक्षण जाहीर झालेल्या नगरपालिकांबाबत निवडणूक आयोगाकडून कोणत्या सूचना दिल्या जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भावांनो नोकरीला करा रामराम! मोदी सरकार देत आहे व्यवसाय करण्याची संधी, व्हाल मालामाल
राज्यातील ज्या नगरपालिकांमध्ये आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. ती रद्द करून नवीन आरक्षण सोडले जाणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची आजची पत्रकार परिषद अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे हे आज सोमवार, 25 जुलै दुपारी 4.00 वाजता पत्रकार कक्ष, मंत्रालय, मुंबई येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाने बांठिया समितीचा अहवाल स्वीकारला होता.
Share your comments