
uddhav thackeray
राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांचे बंधू (Bharat Kokate) भारत कोकाटे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. सध्या सदस्य नोंदणीला वाढता प्रतिसाद आणि दुसरीकडे पक्षामध्ये होत असलेले प्रवेश यामुळे शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा वाढत आहे. यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आत्मविश्वासही वाढत आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर ४० आमदारांनी देखील त्यांची साथ सोडली होती. शिवसेनेच्या खासदारांपासून ते पदाधिकाऱ्यांपर्यंत अनेकांनी (Uddhav Thackeray ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांनी आता हातामध्ये शिवबंधन बांधले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सेनेत प्रवेश केला आहे. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, की शिवसैनिकावर माझा विश्वास असून येथून पुढची प्रत्येक लढाई आपल्याला जिंकायची आहे आणि ते ही मर्दासारखी म्हणत त्यांनी बंडखोर आमदांवर टिका केली. तसेच भविष्यात शिवसेनेच्या नादी लागण्याची कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे, असेही ते म्हणाले.
गोमूत्र करणार शेतकऱ्यांना करोडपती! शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार..
तसेच शिवसेनेचा भगवा कुणालाही हिसकावू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. एक लढाई कोर्टात तर दुसरीकडे रस्त्यावर असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सदस्य नोंदणीचे आवाहन केले आहे, आता कोर्टात काय निर्णय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
साईबाबांचे दर्शन घेऊन मोठा नेता मुंबईला रवाना, आता लाल दिवा घेऊनच येणार?
आता दुधाच्या रिकाम्या पिशवीवर मिळणार पेट्रोल डिझेलवर सूट, वाचा अनोखी ऑफर
शिवप्रभुंचा स्वाभिमान उफाळुन आला तो आग्रा पहिल्या रांगेत, आणि शिंदे साहेब शेवटी, साहेब वाईट वाटल..
Share your comments