कृषी उत्पादित कंपन्या मालाची आयात आणि निर्यात करण्यासाठी बँकांकडून कर्ज घेत आहेत. मात्र कर्ज परतफेड करणाऱ्यांची संख्या कमी आहे. नुकताच
सादर करण्यात आलेल्या अहवालातून एक धक्कदायक आकडेवारी समोर आली आहे. १२ कृषी उत्पादित कंपन्यांनी कर्जाची परतफेड न करता पैशांचा गैरवापर केला आहे.
गेल्या वर्षभरात १२ कृषी उत्पादक कंपन्या या 'सीबीआय' च्या रडारवर आल्या आहेत. या १२ कृषी उत्पादित कंपन्यांनी मालाच्या आयात आणि निर्यातीसाठी बँकांकडून कर्ज घेतले होते मात्र कर्जाची परतफेड न करता त्या पैशांचा गैरवापर केल्याप्रकरणी 'सीबीआय' च्या रडारवर या कंपन्या आल्या आहेत.
आतापर्यंत या कंपन्यांनी बँकांना सुमारे १,४०० कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे सांगितले जात आहे. एवढंच नाही तर गेल्या पाच वर्षांत सुमारे १०० कृषी उत्पादक कंपन्यांनी बँकांना हजारो कोटी रुपयांचा गंडा घातला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षात तांदूळ,डाळी, मसाले, कॉफी अशा कृषी उत्पादित मालांची आयात आणि निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडून बँकांचे कर्ज बुडविण्याचे प्रकार घडत आहेत. याप्रकरणी देशातील मोठ्या कृषी उत्पादित कंपन्यांवर करावई देखील करण्यात आली आहे. गेल्यावर्षी बँकेला ११४ कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी जलाराम राईस कंपनीवरही सीबीआयने कारवाई केली होती.
कारवाई केलेल्या अनेक नामाकिंत कृषी उत्पादित कंपन्यांचा समावेश आहे. श्री वसंत ऑईल कंपनीने बँकेला १२४ कोटी रुपयांचा तर सौरव प्रा. लि. कंपनीची १२६ कोटी रुपयांची थकबाकी होती.
#HarGharTiranga: पीएम मोदींच्या मोहिमेत कृषी जागरणचा समावेश, तिरंगा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा
सीबीआयच्या तपासात, कंपन्यांनी कशा पद्धतीने बँकांना फसवले आहे ते समोर आले आहे. कंपन्यांनी आपल्या मालाच्या आयात आणि निर्यातीसाठी बँकांकडून कर्ज घेतले. तसेच बऱ्याच कंपन्यांनी कर्जाची परतफेड केली नाही. तर काही कंपन्यांनी कर्जापोटी प्राप्त झालेली रक्कम ही बनावट कंपन्यांमध्ये वळवून स्वतःचा फायदा करून घेतला.
महत्वाच्या बातम्या:
कधीही न ऐकलेल्या शेळ्यांच्या जाती! 'या' शेळ्यांना घेऊन करा शेळीपालनाची सुरुवात,व्यवसाय घेईल उंच भरारी
केंद्रीय पथकाकडून पीक नुकसानीची पाहणी; शेतकऱ्याने अधिकाऱ्यांशी साधला फडाफड इंग्रजी मध्ये संवाद
Share your comments