कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यानं केला कांद्याचा अंत्यविधी
१. अवकाळी पाऊस शेतकऱ्यांची पाठ सोडायला काही तयार नाही. या पावसानं शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फेरले आहे. नाशिक जिल्ह्यालाही अवकाळीचा चांगलाच तडाखा बसला असून यात कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. गारपीट आणि अवकाळी पावसामुळं कांदा पीक सडू लागलाय. यातून कांद्याचा दर्जा घसरल्याने बाजारात त्याला कवडीमोल भाव मिळतोय.
त्यामुळे नाशिकच्या सटाणा तालुक्यातील डांगसौंदाणे येथील एका शेतकऱ्याने थेट कांद्याचाच अंत्यसंस्कार केला आहे. योगेश सोनवणे असं या शेतकऱ्याचे नाव आहे. कांद्याला कोणी बोलीसुद्धा लावत नाही. आणि बोली लागली तरी कवडीमोल भावाचीचं लागत आहे. त्यामुळे हताश होऊन या शेतकऱ्याने कांद्याचाच अंत्यविधी केला आहे. तसेच कांदा ट्रॅक्टरच्या साहाय्याने नष्ट करत आपला संताप त्यांनी व्यक्त केला आहे.
राज्यातील शेती शाश्वत झाली पाहिजे आणि यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
२. राज्यातील शेती ही शाश्वत झाली पाहिजे आणि यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
यावेळी त्यांनी शेतकरी आणि सर्वसामान्यांना राबवत असलेल्या योजनांची माहिती दिली. पुढं ते असंही म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले असून शेतकऱ्यांनी मागेल ते देण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचे ते म्हणालेत. तसेच अनेक योजनांच्या माध्यमातून शेती शाश्वत झाली पाहिजे असा सरकारचा प्रयत्न आहे. आणि यातून शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल याकडेही आमचं लक्ष असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मालेगाव येथे तुफान गारपीट आणि मुसळधार पावसाची हजेरी, शेताला तळ्याचे स्वरुप
३. काल मालेगाव येथे तुफान गारपीट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. यात शेती पिकांचं भयंकर नुकसान झालंय. केळीच्या उगवत्या घडांना तर गारांचा मारा बसल्यानं बाजारात त्याचा दर्जा घसरण्याची शक्यता आहे. शिवाय अवकाळीच्या या तडाख्यामुळे ज्वारी पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल असून शेताला तर तळ्याचेच स्वरुप आले आहे.
सतीश कुलकर्णी यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून ही दृश्ये शेयर केली आहेत. सध्या राज्यातील शेतकऱ्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचवणे आता गरजेचं झालं आहे.
उत्तर प्रदेशमध्ये टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका, किलोला मिळतोय दोन रुपयांचा दर
४. आता बातमी उत्तर प्रदेश मधून
उत्तर प्रदेशमध्ये टोमॅटो उत्पादक शेतककऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय. टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांचं आर्थिक गणितच बिघडलंय. टोमॅटोचे दर हे किलोमागे दोन रुपयांवर पोहोचले आहेत. मागील वर्षी शेतकऱ्यांना टोमॅटोला 400 ते 500 रुपये प्रति कॅरेटचा भाव मिळत होता आता मात्र 150 ते 200 रुपयांचा दर मिळत आहे. हवामानात होणाऱ्या बदलाचा हा परिणाम असल्याचं म्हटलं जात आहे.
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी हिंगोली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी
५. हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातील वरुड येथे अवकाळी पाऊस व गारपिटीने प्रचंड नुकसान झालं आहे. येथील नुकसानग्रस्त भागाची कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी केलीये. या भागातील पपई, केळी या फळपिकांचे नुकसान होऊन शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
या झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देश कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच एकही नुकसानग्रस्त पंचनामा पासून वंचित राहता कामे नये आशा सूचनाही दिल्या. मात्र याची अंमलबजावणी होऊन शेतकऱ्यांपर्यंत कधी मदत पोहचणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
'शेतकऱ्यांना माहित नव्हतं की तुम्ही काळे की गोरे आहात'
६. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे गेल्या पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी न फिरकल्याने संतापलेल्या शेतकरी संघटनेने पोस्टर लावले होते, तसेच मंत्रिमंडळात गडबड झाली असून गहाळ शेतकरी संघटनेने मंत्र्याचा शोध घेणाऱ्याला ५१ हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य युवा प्रमुख पूजा मोरे यांनी सांगितले की, गेल्या पाच दिवसांपासून अवकाळीच्या तडाख्यानं बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तरीही बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे एकदाही फिरकले नाहीत. नुकतीच अतुल सावे यांची भेट झाली यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना माहित नव्हतं की तुम्ही काळे की गोरे आहात आज कळलं अशा शब्दात टोला लगावला आहे.
अधिक बातम्या:
कर्नाटकमध्ये मोफत सिलेंडर, व्याजमुक्त कर्ज, भाजपचे शेतकऱ्यांना अच्छे दिन?
पाऊस घेणार विश्रांती, शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा, पंजाब डख यांनी सांगितली तारीख
मोचा' चक्रीवादळ किनारपट्टीला धडकणार, ११ ते १५ मे पाऊस पडणार
Share your comments