आज आपण एक महत्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे. मान्सून २०२२ अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर एक अफवा हि मोठ्या प्रमाणात पसरवल्या जात आहे. तर ती अफवा म्हणजे यंदा मान्सून दहा दिवस आधीच येणार
अशा बातम्या हवामान खात्याच्या हवाल्यातून प्रसिद्धकेल्या जात आहे.अश्या या खोट्या बातम्यांमुळे पावसाळ्यावर अवलंबून असणाऱया कृषि व अन्य उद्योगातील लोकांनी जय्यत तयारी केली. परंतु मान्सूनबाबतच्या या बातम्या खोटय़ा असल्याचे हवामान तज्ञांनीच स्पष्ट केले आहे. इतकेच नव्हे तर हवामान खात्याकडून
अशी माहितीच दिली गेली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.ज्येष्ठ हवामानतज्ञ कृष्णानंद होशाळीकर यांनी ‘देशात मान्सून दाखल होण्यासंबंधीच्या काही दिशाभूल करणाऱया बातम्या अनेक जण पसरवत आहेत. कृपया त्याकडे दुर्लक्ष करावे. अशा खोटय़ा
बातम्यांमुळे अनेकांचे नुकसानच होईल, असे ट्विट केले आहे.मान्सून आगमनापूर्वी शेतकरी व अन्य घटकांची कामे जोमाने सुरू होतात. मान्सून लवकर येण्याच्या बातमीने त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. तो संभ्रम हवामान तज्ञांच्या या स्पष्टीकरणामुळे दूर झाला आहे.
Share your comments