Solapur: केंद्र सरकार नागरिकांचे जीवनमान सुधरवण्यासाठी अनेक योजना आखत असते. त्यात काळानुसार बदल देखील केले जातात. मात्र सध्या बऱ्याच योजना या केवळ नावापुरत्याच राहिल्या आहेत. त्या योजनांचा लाभार्त्याना फायदा होत नाही. सोलापूर जिल्ह्यातील (Solapur district) देखील अनेक योजना या अपूर्ण आहेत. शिवाय पाण्यावाचून शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी जलाशयातून इंदापूर (Indapur) तालुक्यातील लाकडी-निंबोडी या उपसा सिंचन योजनेसाठी पाणी देण्याचा डाव आखण्यात आला आहे. मात्र उजनीचे पाणी लाल झाले तरी बेहत्तर पण हा डाव आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने दिला आहे.
त्यामुळे सोलापूरकरांचा विरोध डावलून उजनी जलाशयातील (Ujani) पाणी बारामती तसेच इंदापूरला (Indapur) देण्यावरून वातावरण आता चांगलेच पेटताना दिसत आहे. उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्यावतीने (Water Rescue Struggle Committee) काल पंढरपुरात या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील आष्टी उपसा सिंचन, शिरापूर उपसा सिंचन, सीना-माढा उपसा सिंचन, एकरुख उपसा सिंचन, मंगळवेढा उपसा सिंचन, सांगोला उपसा सिंचन, सीना भीमा उपसा सिंचन, दहिगाव उपसा सिंचन या उजनी धरणावर अवलंबुन असणाऱ्या योजना अद्यापही अपूर्ण आहेत तरीदेखील इंदापूर तालुक्यातील लाकडी-निंबोडी उपसा सिंचनासाठी पवार - ठाकरे सरकार (Pawar - Thackeray Gov)कोट्यावधी रुपये देत आहेत, हा खुनशी डाव आहे.
असा आरोप देखील समितीने केला आहे. उजनी जलाशय हे सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे आहे त्यामुळे योजनेचे नाव बदलून किंवा ही जुनी योजना आहे असे सांगून सोलापूरकरांच्या डोक्यात दगड घालण्याचे महापाप बारामती व इंदापूरकर करत आहेत. त्यामुळे उजनीचे पाणी लाल झाले तरी बेहत्तर हा डाव आम्ही कधीच यशस्वी होऊ देणार नाही असा इशारा उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
PM kisan Yojana : ठरलं तर ! 'या' तारखेला खात्यात येणार 2 हजार रुपये
ठाकरे सरकारची मोठी घोषणा; आता शेतकऱ्यांना मशागतीसाठी मिळणार मोफत ट्रॅक्टर
तुम्हीही पॅरासिटामोल घेता का? जर घेत असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी, वाचा सविस्तर
Share your comments