गेल्या काही दिवसांपासून भाजपने लोकसभेची जोरदार तयारी केली आहे. पक्षात फेरबदल केल्यानंतर आता भाजप नेते कामाला लागले आहेत. यामध्ये सर्वात महत्वाचा पवारांचा बालेकिल्ला म्हणजे बारामती लोकसभा मतदार संघ हा जिंकायचाच असा व्रतच भाजप नेत्यांनी केला आहे. याचाच एक भाग म्हणून आता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आज बारामती दौऱ्यावर आहेत.
यामुळे या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देशात भाजप चे 400 हुन अधिक खासदार निवडून आणण्याचे लक्ष भाजप च्या वरिष्ठ कार्यकारिणीने ठेवले आहे. ज्या ठिकाणी 2019 मध्ये भाजप दुसऱ्या स्थानावर होते. त्या ठिकाणी भाजप पूर्ण ताकतीने लढणार आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती मतदार संघाचा समावेश आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे पवार कुटुंबियांच्या प्रचाराचा नारळ ज्या कन्हेरीच्या हनुमान मंदिरात फुटतो, त्याच मंदिरात आज चंद्रशेखर बावनकुळे जाणार आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार गेली ५५ वर्ष राजकारणात आहेत. निवडणूक कोणतीही असो, आपल्या प्रचाराचा नारळ ते कन्हेरीच्या हनुमान मंदिरात फोडतात अन् निवडणुकीच्या मैदानात उतरतात.
बातमी कामाची! आता विमा पॉलिसीवर कर्ज मिळेल, व्याजदरही कमी, वाचा महत्वाची माहिती
दरम्यान, ५५ वर्षात पवार एकही निवडणूक हरलेले नाहीत. आज बावनकुळे कन्हेरीच्या मंदिरात जाऊन बजरंगबली हनुमानाचा आशीर्वाद घेणार आहेत. यामुळे आता कन्हेरचा बजरंगबली कोणाला पावणार हे येणाऱ्या काही दिवसांमध्येच समजणार आहे. बारामती लोकसभा मतदार संघ हा पवारांचा बालेकिल्ला मानला जातो गेली पन्नास वर्ष पवार गटाची बारामतीवर सत्ता आहे.
कृषी जागरणचे २६ व्या वर्षात पदार्पण, देशातील शेतकऱ्यांचे हित जोपासणारा पहिला मीडिया हाऊस..
दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर येथील जवळपास एक हजार युवकांचा भाजप मध्ये प्रवेश होणार असल्याची देखील माहिती आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपने आतापासूनच सुरु केली आहे. प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून बावनकुळे यांचा पुणे जिल्ह्यात पहिला दौरा आहे.
महत्वाच्या बातम्या;
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर राणे कुटुंबाच्या कारला अपघात, ट्रकने दिली धडक
शेतकऱ्यांनी जगायचे कसे? उडीद, तुरीचे मोठे नुकसान, रोहित पवारांची मदतीची मागणी
सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर आनंद महिंद्रा यांनी घेतली शपथ, म्हणाले यापुढे कधीच कारमध्ये..
Share your comments