1. बातम्या

लॉकडाऊन दरम्यान बँक ऑफ बडौदाची ऑफर ; देत आहे कमी व्याजदरात ५ लाख रुपयांपर्यंतचे स्पेशल कर्ज

KJ Staff
KJ Staff


कोरोना (COVID-19 ) मुळे देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.  विषाणूचे संसर्ग होऊ नये यासाठी लॉगडाऊन करण्यात येत आहे. या लॉकडाऊन मुळे अनेक उद्योग बंद झाले आहेत. यामुळे मध्यमवर्गीय आणि छोटे उद्योग करणारे, दुकानदार, शेतकरी यांच्या कडील रोकड पैसा संपत आहे. त्यांना आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.  अशा परिस्थितीत बँक ऑफ बडौदा(bank of baroda) आपल्या ग्राहकांसाठी एक ऑफर घेऊन आले आहे. बँकेने कोविड-१९ (COVID-19 ) साठी स्पेशल कर्ज योजना लॉन्च केली आहे. हे वैयक्तिक कर्ज (personal loan) असून याचा फायदा रिटेल कस्टमर घेऊ शकतात. बँक साधारण पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज या प्रकारात देत आहे,.

बँकेने याविषयीची माहिती आपल्या अधिकृत संकेतस्थळावर दिली आहे. यात सांगण्य़ात आले आहे की, कोरोना व्हायरस १८० देशात पसरला आहे. भारतातही कोरोनाने आपले पाय रोवले आहेत. यामुळे आर्थिक नुकसान होत असून केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी लॉकडाऊन केले आहे.  अशा स्थितीत लिक्विडिटीची समस्या उद्भवत आहे, रोकड पैसा हाती नसल्याने अनेक जण चिंतेत आहेत.  यामुळे बँकेने हे विशेष कर्ज आणले आहे. याची मर्यादा ५ लाख रुपयांर्यंत आहे.  विशेष कर्ज असल्याने याचा व्याजदर नेहमीच्या वैयक्तिक कर्जापेक्षा कमी असेल. ही ऑफर ३० सप्टेंबर २०२० पर्यंत चालू राहिल.

व्याज दर

बीआरएलएलआर + एसपी + २.७५% पीए (मासिक व्याजासह)

दंडात्मक व्याज: दंडात्मक व्याज २%. थकबाकी रक्कम किंवा अटी व शर्ती पूर्ण न केल्यास २% पॅनेल व्याज म्हणजे दंड व्याज.

प्रीपेमेंट शुल्क: शून्य

प्रक्रिया शुल्क: ५०० रुपये आणि लागू जीएसटी

कर्जाची मर्यादा

किमान: २५,०००रुपये

कमाल: ५ लाख

परतफेड कालावधी: 60 महिने

सीआयबीआयएल स्कोअर किती महत्वाचे आहे: 650

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters