बळीराजाला मिळेल पुरेपुर वीज; सरकारने सुरू केला कृषी ऊर्जा पर्व

05 March 2021 02:47 PM By: KJ Maharashtra
कृषी ऊर्जा पर्वाचा शुभारंभ

कृषी ऊर्जा पर्वाचा शुभारंभ

राज्यातील बळीराजाला दिवसा आणि पुरेशा प्रमाणात वीज देणे हे शासनाचे प्राथमिक कर्तव्य असून महाकृषी ऊर्जा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा प्रकारचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

या अभियानांतर्गत कृषी ऊर्जा परवाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विधानभवनात पार पडला. या शुभारंभाप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, उजळ विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

 यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोना काळामध्ये सर्व देशात आणि राज्यांमध्ये लॉकडाऊन असताना शेतकरी बांधव मात्र त्यांचे काम करत होते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी लॉकडाऊन केले असते तर कठीण परिस्थिती निर्माण झाली असती. इतरांसाठी मुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात काटे, येऊ नयेत यासाठी त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे सरकार ठामपणे उभी राहील अशी ग्वाही देखील ठाकरे यांनी दिली.

 

पुढे बोलताना ऊर्जामंत्री राऊत म्हणाले की, नवीन कृषी पंप वीज तोडणी धोरणांतर्गत 19 फेब्रुवारीपर्यंत 10 हजार शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याचे उद्दिष्ट पेक्षाही अधिक काम करत सुमारे सुमारे 18 हजार शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली आहे. कृषी वाहिन्यांच्या सौर ऊर्जा करणा अंतर्गत 84 वाहिन्यांना लघु सौर ऊर्जा प्रकल्पातून वीज पुरवली जात असून त्याद्वारे त्याद्वारे तीस हजाराहून अधिक शेती पंपांना दिवसा वीज पुरवठा केला जात आहे.  

तसेच कृषीऊर्जा प्रवाह अंतर्गत एक मार्च पासून ते 14 एप्रिलपर्यंत विविध प्रकारचे उपक्रम आयोजित केले असून या उपक्रमांच्या माध्यमातून महा कृषी ऊर्जा अभियानाची माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी व्यापक प्रमाणात प्रचार आणि प्रसिद्धी करण्यात येणार आहे आहे.

या उपक्रमांमध्ये कृषी वीज ग्राहकांचा मेळावा घेणे, ग्राहक संपर्क अभियान राबवणे, तसेच ग्रामपंचायत आणि ग्रामसभेत  प्रबोधन करणे असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

कृषी ऊर्जा पर्व Agricultural Energy Festival मुख्यमंत्री उद्धव ठाकरे chief minister uddhav thackeray ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत Energy Minister Dr. Nitin Raut
English Summary: Baliraja will get enough electricity, the government has started an agricultural energy festival

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.