परभणी जिल्ह्याच्या पूर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी बालाजी रामराव खैरे तर उपसभापती पदी रुख्मीनबाई मारोतराव पिसाळ यांची तारीख २५ मे २०२३ रोजी तहसीलदार बोधीकर व पूर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नितीन देसाई यांच्या अधिपत्याखाली बाजार समितीच्या संचालकांची मतदान प्रक्रिया घेऊन सर्वानुमते ही निवड करण्यात आली.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा माजी सभापती बालाजी देसाई,जिल्हाप्रमुख विशाल कदम,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालूकाध्यक्ष शहाजी देसाई यांच्या संयुक्त आघाडी पॅनल मध्य निवडून आलेल्या सर्व संचालकांची तारीख २४ मे रोजी बैठक घेऊन वरील निवडीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते.
त्यावरुन बालाजी खैरे यांची सभापती तर रुख्मीनबाई मारोतराव पिसाळ यांची उपसभापती पदी निवड करण्यात आली.
शेतात काम करताना ट्रॅक्टर खाली सापडला शेतकरी, बारामतीत युवा शेतकऱ्याचे दुर्दैवी निधन..
सभापती बालाजी खैरे,उपसभापती प्रतिनिधी नारायण पिसाळ यांनी माजी सभापती बालाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील काळात कृषी उत्पन्न बाजार समितीचा शेतकरी हितार्थ आवश्यक तो विकास करण्यात येईल असे निवडीनंतर शिवसेना संपर्क कार्यालय येथे शिवसैनीकांच्या सत्कार कार्यक्रमाचे वेळी सुतोवाच केले.
कृषीजागरण साठी प्रतिनिधी आनंद ढोणे पाटील परभणी.
सर्वाधिक एफआरपी थकीत ठेवणाऱ्या साखर कारखान्यांमध्ये पहिले 2 कारखाने इंदापूरचे....
हिंगोलीत मेंढ्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला मोठा अपघात, 150 मेंढ्या आणि 5 जणांचा जागीच मृत्यू...
कांदा निर्यातीत मोठी वाढ, दरांकडे शेतकऱ्यांचे लक्ष...
Share your comments