देशांतर्गत गव्हाची उपलब्धता कमी होण्याची शक्यता पाहता भारताने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली. मागे कारणे देखील तशीच आहेत. यावर्षी उष्णतेच्या लाटेमुळे गव्हाच्या उत्पादनात घट झाली आहे.
अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन व गव्हाच्या पिठाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे वाढत्यागव्हाच्या किमतींवर नियंत्रण मिळावे यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. भारताने हा निर्णय घेतला परंतु त्याचा परिणाम पूर्ण जगात दिसू लागला आहे.G7 देशांनी भारताच्या या निर्णयाला विरोध केला आहे. कारण भारताच्या या निर्णयामुळे जगभरातील अन्न संकट अधिक वाढू शकते असे या देशांचे म्हणणे आहे.
भारताने या निर्णय घेताच जगभरातपरिणाम जाणवू लागले आहेत.गव्हा पासून बनणारे ब्रेड आणि नूडल्सयांच्या किमती देखील वाढले आहेत.पुढे येणार्या भविष्यकाळात गव्हापासून बनवलेले खाद्यपदार्थ खूप महाग होऊ शकतात. या लेखात आपण भारताच्या या निर्णयाचे जागतिक बाजारपेठेत होणारे परिणाम पाहू.
भारताच्या या निर्णयाचा जागतिक बाजारपेठेवर परिणाम
भारत हा जगातील सर्वात मोठा गहू निर्यातदार देश असून देशांतर्गत बाजारपेठेत गव्हाच्या उत्पादनांच्या किमती वाढल्यामुळेकेंद्र सरकारने हा निर्णय घेतला.
. परंतु यामध्ये 13 मे पूर्वी लेटर ऑफ क्रेडिट साठी आदेश जारी केले आहेत ते निर्यात केले जातील. चालू वर्षी सुरुवातीपासूनच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये गव्हाच्या किमतीत साठ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारताच्या या निर्णयाने जागतिक बाजारपेठेत गव्हाच्या किमती मध्ये आणखी वाढ होईल व त्याचा परिणाम तात्काळ दिसू लागला आहे. जागतिक बाजारपेठेमध्ये ब्रेड, केक ते नूडल्स,पास्ता यांच्या किमतीत वाढ होत आहे. जगातील एक तृतीयांश गव्हाचे उत्पादन युक्रेन आणि रशिया या दोन देशात होते.
परंतु तेथील युद्धामुळे उत्पादन आणि पुरवठा साखळी वर विपरीत परिणाम झाल्यामुळे तेथील निर्यात थांबली आहे. त्यातच भारताच्या या निर्णयामुळे आधीच आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत अशा देशांवर याचा अधिक विपरीत परिणाम होणार आहे. यासंदर्भात ग्लोबल फूड क्रायसिस चा अहवाल पाहिला तरयानुसार,कांगो,अफगाणिस्तान, सीरिया, सुदान, पाकिस्तानइत्यादी देशांना या बंदीचा सर्वाधिक फटका बसणार आहे.
G 7 देशांचा भारताच्या निर्णयाला विरोध
भारताच्या गहू निर्यात बंदीच्या निर्णयाला जी 7देशांनी विरोध केला असून जर्मनीच्या कृषिमंत्री केम ओझदेमीर म्हणतात की, या निर्णयामुळे जगभरात अन्न संकट निर्माण होईल. G 7देशामध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युके आणि अमेरिका या देशांचा समावेश होतो. या देशाचे कृषिमंत्री भारताला गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालू नका असेच सांगत आहेत.
रशिया युक्रेन युद्धामुळे गव्हाच्या संकटात आणखीन भर
जर आपण जगातील गहू निर्यात करणाऱ्या पहिल्या पाच देशांचा विचार केला तर यामध्येरशिया,अमेरिका,कॅनडा, फ्रान्स आणि युक्रेन या देशांचा समावेश होतो. या पाच देशांपैकी 30% रशिया आणि युक्रेन मधून गव्हाची निर्यात केली जाते. परंतु या दोन देशातील युद्धमुळे गव्हाच्या उत्पादनात घटच नाही तर निर्यात वर देखील परिणाम झाला असून निर्यात पूर्णपणे थांबले आहे.
युक्रेन या देशाच्या बंदरांना रशियन सैन्याने वेढा घातल्यामुळे मूलभूत पायाभूत सुविधा तसेच धान्याची दुकाने या युद्धामध्ये नष्ट झाली आहेत.इजिप्त,तुर्कीआणि बांगलादेशहे तीन देश रशियाचा अर्धा गहू खरेदी करतात.त्याप्रमाणेच इजिप्त,इंडोनेशिया,फिलिपाईन्स,तुर्की आणि ट्युनिशिया या देशांना युक्रेनमधील गहू जातो.
परंतु या दोन्ही देशांचा पुरवठा सध्या बंद आहे. त्यामुळे गव्हाची मदार ही भारतावर टिकून होती. परंतु भारताने देशांतर्गत खर्च भागवण्यासाठी निर्यातीवर ज्याप्रकारे निर्बंध लादले त्याचा आंतरराष्ट्रीय बाजारात आता मोठा परिणाम होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:दिलासादायक बातमी! खाद्यतेलाच्या किमती पुढील पंधरवड्यापासून कमी होण्यास होईल सुरुवात
Share your comments